भव्य बौद्ध धम्म पदयात्रेचे सर्वधर्मीया कडून जंगी स्वागत
धम्म पदयात्रा परभणी ते चैत्यभूमी असा 559 किमी करणार पायी प्रवास
धम्म पद यात्रेत 110 आंतरराष्ट्रीय भिक्कु संघाचा समावेश
सर्वच राजकीय पक्षांनी भिक्कु संघाचे जागोजागी केले स्वागत
भिक्कु संघाच्या स्वागता साठी शहरातील रस्ते फुलांनी व रांगोळ्यांनी सजले
जिंतूर प्रतिनिधि/माबुद खान/जिंतूर– बौद्ध धम्म पदयात्रा सोहळ्याचे परभणी ते जिंतूर मार्गावरील विविध ग्रामीण भागासह आज शहरात जंगी स्वागत करण्यात आले.सदरील धम्म पदयात्रा 17 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान परभणी ते चैत्यभूमी (दादर) मुबंई असा 559 किमीचा या पदयात्रेत आंतरराष्ट्रीय 110 भिक्कु संघाचा प्रथम समावेश असल्याने असल्याने महत्व प्राप्त झाले आहे.या बौद्ध भिक्कु पदयात्रेच्या रॅलीत थायलंडचे जागतिक भन्ते लॉंगफुजी सह अन्य थायलंड येथील भिक्कु संघाची उपस्थिती होती.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीनंतर बौद्ध धम्माची बौद्धिक बांदल की व्हाय म्हणून पुन्हा भारत बौद्धमय करण्याचा संकल्प घेऊन आंतरराष्ट्रीय भिकू संघाची ऐतिहासिक धम्म पदयात्रा परभणी ते चैत्यभूमी दादर असे निघालेली आहे मानवात मैत्रीचे नाते जोडणे बुद्ध धम्माच्या महान तत्वज्ञानाचा प्रसार व प्रचार करणे या उदात्त हेतूने ही धम्म पदयात्रा चैत्यभूमीच्या दिशेने जाणार आहे सर्व भारतीयांना न्याय देणारे संविधान शक्तिशाली करण्यासाठी जगात व देशात शांतता निर्माण व्हावी समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय धर्मनिरपेक्ष या मानवी मूल्याची प्रतिष्ठापना व्हावी यासाठी ही ऐतिहासिक धम्मय पदयात्रा निघालेली आहे परभणी ते चैत्यभूमी दादर मुंबई पर्यंत निघत असलेल्या या पदयात्रा प्रस्थान सोहळ्यानिमित्त भारतात प्रथमच तथागत बुद्धांच्या पवित्र अस्थी कलश सुद्धा येत आहे आंतरराष्ट्रीय भिकू संघ या मान्यवराच्या उपस्थित धम्म पद यात्रेचा भव्य प्रस्थान सोहळा तथागत गौतम बुद्ध यांचे अस्तित्व दर्शन व बुद्धिमूर्ती वाटप तसेच धम्म देशना सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय सोहळ्याच्या स्वागता साठी आज शहरात सर्वच विविध राजकीय पक्ष प्रमुखानी आवर्जून उपस्थिती लावलेली होती.शहरात प्रवेश होण्यापूर्वी भाजप तालुका अध्यक्ष लक्ष्मणराव बुधवंत यांनी पांगरी फाट्यावर सुव्यवस्थित नियोजन करत भिक्कु संघाचे यथोचित पुष्क देऊन स्वागत केले.माजी आमदार विजय भांबळे यांनी औंढा टी पॉइंट वर भिक्कु संघास अभिवादन केले.काँग्रेस प्रदेश सचिव सुरेश नागरे , माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख यांनी सुद्धा भिक्कु संघास अभिवादन केले.या सह माजी नगराध्यक्ष सचिन गोरे यांनी आमदार मेघना बोर्डीकर यांच्या कार्यालया समोर भिक्कु संघास आपल्या असंख्य कार्यकर्त्या समवेत सबंध भिक्कु संघास अभिवादन केले. शहरात भिक्कु संघाच्या स्वागता साठी महिला मंडळांनी प्रस्थान होणाऱ्या मार्गावर रंगीबेरंगी विविध रांगोळ्या व फुले टाकून अण्णाभाऊ साठे चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या पर्यत परिसर सुशोभित करत शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते. नगर परिषद समोरील प्रागणात झालेल्या कार्यक्रमा सामूहिक धम्म महावंदना घेण्यात आली.या वेळी समाजबांधवाची मोठ्या प्रमानावर उपस्थिती होती.या वेळी सिनेअभिनेते गगन मलिक, लोकनेते विजय वाकोडे,माजी समाजकल्याण सभापती रामराव उबाळे,नानासाहेब राऊत,विकास अण्णा मोरे,संभाजी खिल्लारे,आशा खिल्लारे,बंटी निकाळजे,गुणीरत्न वाकोडे,अशोक बुधवंत,रत्नदीप शेजावळे, अशोक मोरे,कर्मवीर घनसावध, युवराज घनसावध,सुमेध सुर्यवंशी,प्रकाश नवसागर,सतीश वाकळे,प्रीतम वाकळे,राजेश्री देबाजे,रमेश गुज्जर,या सह शेकडो समाजबाधवांची व बहुसंख्य महिलांची उपस्थिती होती. या बौद्ध धम्म पदयात्रेचे आयोजक सिध्दार्थ हत्तीअभिरे यांनी केलेले आहे.