युवकमित्र’च्या ‘सायकल बँक’उपक्रमंतर्गत ‘विकास हायस्कूल शहादा जि.नंदूरबार येथे 60 विद्यार्थ्यांना मोफत सायकलीचे वितरण…!
शहादा ,प्रतिनिधी /युसुफ पठाण/युवकमित्र परिवार पुणे च्या ‘सायकल बँक’उपक्रमंतर्गत पिंगाणे,कुकडेल व मनरद शिवारातून पायी चालत शाळेत येणाऱ्या अंत्यत गरीब व गरजु अशा 60 विद्यार्थ्यांना मोफत सायकलीचे वितरण करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी शहादा तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.अभीजितदादा पाटिल,उदघाटक म्हणून इन्क्लाब बिग्रेड शहादा संस्थेचे अध्यक्ष मा.संदीपसिंग राजपाल,युवकमित्र परिवार संस्थेचे संस्थापक तथा सायकल बँक योजनेचे प्रमुख प्रवीण महाजन,सामाजिक कार्यकर्त्यां मा.भारतीताई पवार व इन्क्लाब बिग्रेडचे सर्व कार्यकर्त तसेच शाळेचे प्राचार्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.
प्रसंगी पुणे व पिम्परी चिंचवड़ शहरातील नागरिकांनी देऊ इच्छिलेल्या विनावपर सायकली दुरुस्ती करून ग्रामीण भागातील वंचित विद्यार्थ्यांना सायकल बँक उपक्रमंतर्गत मोफत वितरित केल्या जातात.या उपक्रमंतर्गत वर्षभरात तब्बल 1000 सायकली वंचित विद्यार्थ्यांना वितरित केल्या असून राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्त २५० सायकली वितरित करत असल्याचे उपक्रमाचे प्रमुख प्रवीण महाजन यांनी सांगितले. सदर सायकली दुरुस्तीसाठी इन्क्लाब बिग्रेडचे संदीपसिंग राजपाल यांचे सहकार्य लाभले तर सायकली वाहतूकीसाठी शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.