व्हाईस ऑफ मीडीयाचा मराठवाडा स्तरीय सर्वोत्कृष्ट पुरस्कार विजय चोरडिया यांना प्रदान!
जिंतुर/.प्रतिनिधी /माबुद खान जिंतूर : पत्रकार आणि पत्रकारीतेसाठी कृतीशिलपणे काम करणा-या देशातील नंबर वन ठरलेल्या व्हाईस ऑफ मीडीयाचे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन हे तारीख १८ व १९ नोव्हेंबर २०२३ रोजी बारामती येथील गदीमा सभागृहात शानदार पणे यशस्वीरित्या पार पडले. या अधिवेशनात मराठवाडा विभागात पत्रकारांची एकजुट घडवून आणण्यात मोलाचे कार्य केल्या बद्दल व्हाईस ऑफ मीडीचा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट मराठवाडा विभागीय पुरस्कार हा विजय चोरडिया यांना व्हाईस मीडीयाचे जेष्ट संजय पडोळे, अनिलजी मस्के पाटील, उर्दू विंगचे हारुन नदवी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पद्मश्री पोपटराव पवार, गोदावरी समुहाच्या राजश्री हेमंत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सदरील व्हाईस ऑफ मीडीयाच्या दोन दिवसीय राज्य शिखर अधिवेशनास महाराष्ट्र राज्यातील असंख्य पत्रकार उपस्थित होते. तर या वेळी माजी केंद्रिय कृषीमंत्री शरदचंद्र पवार, सुनित्राताई पवार, कुमार सप्तर्षी, कुमार केतकर, प्रकाश भाऊ पोहरे, जयश्री खाडीलकर यासह अन्य विचारवंतांनी पत्रकारीतेवर विचार मांडले. मराठवाडा स्तरीय सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाल्यामुळे व्हाईस ऑफ मीडीयाचे मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया यांचे पत्रकारीता जगतेतून अभिनंदन होत आहे.