सलमान खानला शस्त्र ठेवण्याचा परवाना मिळाला आहे !
मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांना स्वसंरक्षणा साठी शस्त्र परवाना 22 जुलाई 2022 मागनी..
मुंबई ,प्रतिनिधी-: के . रवि ( दादा ) मुंबई : सलमान खानने नवनिर्वाचित मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर ह्यांची स्वसंरक्षणासाठी शस्त्र ठेवण्याचा परवाना 22जुलाई 2022 रोजी मागतीला होता तो आता त्यांना मिळाला आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला आहे. 22 जुलै 2022 रोजी सलमान खानने आयुक्त विवेक फणसाळकर यांची शस्त्र ठेवण्याच्या परवान्याबाबत भेट घेतली होती.
5 जून 2022 रोजी सलमान खानला धमकीचे पत्र मिळाले होते, त्यानंतर मुंबईचे वांद्रे पोलीस त्याच्या तपासात गुंतले आहेत. सलमान खानला मिळालेल्या धमकीच्या पत्रात गायक सिद्धू मुसेवालाप्रमाणे त्यालाही मारले जाईल, असे स्पष्टपणे म्हटले होते.