असंख्य विद्यार्थी आणि पालकांनी अनुभवले “एक्झाम इज फन” चे धडे..
बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) प्रा. प्रवीणकुमार सरांचे यश एज्युकेशन अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे खोपोलीमध्ये नुकताचा कोणत्याही प्रकारची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थांसाठी ” एक्झाम इज फन ” परिक्षा एक गंमत आहे , गमतीदार खेळ आहे . हा उपक्रम घेण्यात आला. पुणे, नवी मुंबई , खालापूर ,कर्जत, सुधागड ,पेन , पनवेल , ठाणे आदी जिल्हे व तालुक्यातून शेकडो विद्यार्थ्यानी अनुभव घेतला. खोपोलीतील प्रख्यात “श्री राम मंगल कार्यालयात ” हा उपक्रम घेण्यात आला. या कार्यालया समोरिल पटांगण विद्यार्थ्याच्या रांगांनी सकाळी 9 वाजल्यापासून भरून गेले होते. बरोबर सकाळी 9:40 वाजता मुलांना हॉल मध्ये प्रवेश देण्यात आला. शिस्तप्रिय वातावरण, परिक्षा देणाऱ्या मुलांना कोणत्या प्रकारचे अडथळे येतात आणि त्यावर मात कशी करावी.
करीता मनाची मानसिक तयारी कशी करावी. यांचे चलचित्रित , शाब्दिक , संगीतबद्ध अशा विविध क्लुप्त्याचे मिश्रण करून उपस्थित जवळ जवळ 500 मुलांना प्रवीणकुमार सरांनी टेंशन फ्री केले. हसत खेळत उड्या मारत बागडत असा मनात भरणारा आणि डोळ्याचे पारणे फेडणारा अद्वितिय अप्रतिम असा मोठ्या दिमाखात कार्यक्रम पार पडला.
प्रवीणकुमार सरांचे यश क्लास आणि संपूर्ण टीमने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविरत मेहनत घेतली. या क्लासची मुलं म्हणजे उद्याचे उत्तम गुणी असे टीम लीडर्स असू शकतात. असे चित्र त्यांच्या मॅनेजमेंट वरून शिस्त प्रिय वर्तनावरून दिसून येते.
जीवनातील कोणतीही परिक्षा अगदी लीलया पार पाडतील यात शंकाच नाही. पण ही मुलं या देशाचे एक आदर्शवत सरोत्तम नागरीक बनतील. हे चित्र या कार्यक्रमातून दिसून आले. वेगवेगळ्या प्रभागातून आलेली मुलं सुरुवातीस एक मेकास अनोळखी वाटत होती ,पण जसा कार्यक्रम सुरू झाला आणि वेगवेगळे धडे प्रवीणकुमार सरांनी देण्यास सुरुवात झाली त्यानुसार मुलं एक मेकाच्यात मिसळून गेली. भरघोस प्रतिसाद देत राहिली. जीवनातील कोणतीही परिक्षा देत असणाऱ्या मुलांकरिता अशा कार्यक्रमाचे आयोजन जागोजागी केले गेले पाहिजे. यातून त्यांचे मनोबल वाढेल. परिक्षा हे टेंशन नाही तर परिक्षा ही एक गंमत आहे. गमतीदार खेळ आहे. हे समजल्यास 100% यशस्वी होऊ शकतील. तणावमुक्त होतील. सर्वांना जेवणाची आणि बाकी नियोजन व्यवस्था उत्तम होती.