हॉटेल मानस तिलोरे माणगाव येथे शिक्षक परिषदेच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न….
बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा रायगडच्या वतीने सन 2023 च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा हाॅटेल मानस सभागृह तिलोरे माणगाव येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे व शिक्षक नेते संजयजी निजापकर यांच्या उपस्थितीत व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा रायगडचे जिल्हाध्यक्ष विजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या वेळी व्यासपीठावर शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, शिक्षक नेते संजय निजापकर, जिल्हाध्यक्ष विजय पवार, कोकण विभागाचे कार्यवाह उमेश महाडेश्वर, कोकण विभागाचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे, राज्य प्रसिद्धी प्रमुख रवीकिरण पालवे, जिल्हा कार्यवाह गजानन देवकर आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विजय पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात संघटनात्मक बाबींचा उल्लेख करून शिक्षक परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये होत असलेल्या कामाचा आढावा घेतला, मागील काळात जिल्हा स्तरावर केलेल्या कामाची माहिती दिली. तसेच दिनदर्शिका आपण का छापतो याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. त्याच बरोबर परिषदेच्या माध्यमातून रक्तदान, शिबिर दिनदर्शिका प्रकाशन, हळदीकुंकू दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा इ समाजउपयोगी कामे केली जातात याची माहिती प्रास्ताविकात दिली.
या नंतर राज्याचे राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राज्यस्तरावर होत असलेले कामे त्यात जुनी पेन्शन योजना लागू करणे, मुख्यालय राहण्याची अट रद्द करणे, केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी पदे भरणे, आश्वा सित प्रगत योजना लागू करणे या विषयी माहिती सांगून राज्यस्तरा वरून वेतना बाबत होत असलेला विलंब याविषयी करावयाच्या आंदोलना संदर्भात मार्गदर्शन केले व दिनदर्शिकाच्या प्रकाशन सोहळ्या शुभेच्छा दिल्या.
शिक्षक नेते संजय निजापकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राज्यातील व जिल्ह्यातील शिक्षक परिषदेच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले व दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा रायगडच्या नूतन पदाधिकाऱ्याची निवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
कार्याध्यक्ष प्रदीप खाडे रोहा, जगदीश चवरकर मुरुड,कोषाध्यक्ष संजय पाटोळे माणगाव, संघटन मंत्री वैभव कांबळे महाड, कार्यालयीन प्रमुख दीपक खाडे खालापूर, उपाध्यक्ष संदेश पालकर पोलादपूर, संजय कोंडविलकर महाड, समीर होडबे महाड, अशोक जाधव माणगाव, प्रदीप अडीत माणगाव, संतोष पटाईत तळा, बादल जाधव रोहा महिला आघाडी स्मिता पाब्रेकर माणगाव, हर्षाली काळे रोहा, सीमा चव्हाण श्रीवर्धन, संघटक समीर मुल्ला पोलादपुर, रमेश देठे महाड, अनिल नाचपले माणगाव, अरविंद मोरे तळा, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी गुबनरे महाड आदि पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली
मान्यवरांच्या हस्ते सदर नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमासाठी दीपक साळवी,अमोल केतकर, बाळासाहेब बारगजे, उरण तालुका अध्यक्ष श्रीकांत माने, पोलादपूर तालुकाध्यक्ष अरुण मोरे, कार्याध्यक्ष पंकज निकम,माणगाव तालुका अध्यक्ष गणेश निजापकर, कार्यवाह सुजित भोजने, कोषाध्यक्ष सतिश ढेपे, रोहा तालुका अध्यक्ष उमाजी जाधव, रवींद्र विजापुरे, बापुराव रायफळे, अनिल कराड,ईश्वर पाटील आदि पदाधिकारी व जिल्ह्यातील शिक्षक बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा कार्यवाह गजानन देवकर यांनी केले.