विज वितरण कंपनीला लोडशेडींग बाबतीत निर्वाणीचा इशारा – अनिल जगताप
बीड/ प्रतिनिधी/पेंडगाव सब स्टेशन अंतर्गत तुकाराम वस्ती औरंगपूर इरगाव बऱ्हाणपूर व भाटसांगवी या गावात एक दिवसाआड चार तास वीज उपलब्ध होत आहे. जे की अन्यायकारक आहे शेतीला पाणी देण्यासाठी ही दिवसाआड चार तास वीज पुरेशी नाही व बाकी इतर परिसरातील लोकांच्या सुद्धा याबाबत अनेक तक्रारी येत आहेत.
त्यामुळे या अन्यायकारक बाबीवर तात्काळ उपयोजना करून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या त्रास दूर करावा नसता आपल्याला शेतकऱ्यांच्या उद्रेकाचा सामना करावा लागेल व तसेच येत्या तीन दिवसात यावर उपयोजना झाली नाही तर बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने व समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल ही विनंती करत माननीय कार्यकारी अभियंता मरावी वितरण कार्यालय बीड येथे निवेदन देण्यात आले
या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बीड अनिल जगताप शिवसेना जिल्हा संघटक नितीन धांडे शिवसेना उपजिल्हाप्रमुख आशिष मस्के हनुमान जगताप शिवसेना तालुकाप्रमुख गोरख सिंघण शामरावजी पडुळे मधुकर शिंदे,माऊली गोंडे,सरपंच गोरख चागन उपसरपंच कमलेश्वर बोरवडे,राम पडुळे,सुधाकर पडुळे, कैलास पडुळे, सुजीत पडुळे, स्वप्निल मुळे, सय्यद सद्दाम,पोपट जगताप, नामदेव म्हेत्रे व शिवसैनिक उपस्थित होते.