नागरिकांच्या अडचणी ह्या आमच्या अडचणी समजून काम करतो – डॉ.योगेश क्षीरसागर
ढगे कॉलनी येथे योगेश भैय्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न
बीड (प्रतिनिधी)ः- ढगे कॉलनी, बार्शी नाका परिसरातील जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी आणि समस्या सोडविण्याचे काम जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून होईल या दृष्टिकोनातून अमोल गलधर मित्रमंडळाच्या वतीने योगेश भैया जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन युवा नेते डॉ.योगेश भैया क्षीरसागर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले की, ढगे कॉलनी, मोमीनपुरा, बार्शी नाका परिसरातील जनसेवेचा ध्यास घेऊन दैनंदीन गरजा सोडविण्यासाठी कार्यालय सुरू केले आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय महत्वाची भूमिका बजावत असते. या भागात हातावर पोट असणारे,मोलमजुरी करणारे, गोर गरीब लोक राहतात.त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आठवड्यातून एक दिवस या कार्यालयात येऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम करण्यात येईल. या भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. उर्वरित राहिलेली येत्या सहा महिन्यांत आदरणीय जयदत्त आण्णांच्या माध्यमातून पूर्ण करून अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले.दलीत वस्ती, नगरोत्थान अंतर्गत जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून विकास कामे पूर्ण केली जातील. या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडविण्यात येतील.आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.आम्ही आपली अडचण ही आमची अडचण समजून काम करत असतो असे डॉ. योगेश भैया क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी विनोद मूळूक, रवींद्र कदम, मुकीद लाला, शुभम धूत, सुधीर भांडवले,गणेश जगताप,राजू ढोले, शहादेव वंजारे, शुभम कातांगळे, राजू कुसळकर, गोरख काळे, रामेश्वर राऊत, प्रवीण सुरवसे, ज्ञानेश्वर राऊत, दीपक चौगुले, डॉ.रमेश शिंदे,माजेद कुरेशी, अनिस शेख, धनंजय काळे, अमोल गलधर मित्र मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.