लोकशाही राष्ट्रवादी मोर्चा जिल्हा अध्यक्षपदी प्रा.अंकुश चव्हाण
बीड। प्रतिनिधी/लोकशाही राष्ट्रवादी मोर्चा या पक्षाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी प्रा.अंकुश चव्हाण यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आनंद मोहन (मुंबई), शेख बक्शु, अर्जुन उजगरे यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. भारत देशामध्ये लोकशाही मानवी मूल्य व राष्ट्राचा विकास करण्यासाठीचे कार्य करणारा हा राष्ट्रीय पक्ष आहे. बीड जिल्ह्यात गाव तेथे पक्षाच्या शाखा तयार करण्यात येणार असून कार्यकर्त्याला प्रशिक्षित करण्यात येणार असल्याचे अंकुश चव्हाण यांनी म्हटले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अॅड.शेख बक्शु, अॅड.झिंजुर्डे एस.एल, अॅड.एस.एस.साळवे, अॅड.सुरेश वडमारे, अशोक सोनवणे, बापू पवार, बाबा चव्हाण, जाधव डी.के, अशोक कांबळे, अॅड.पी.के.वीर, अर्जुन उजगरे आदींनी अभिनंदन केले असून मित्र परिवाराकडून स्वागत होत आहे.