सौ. किस्किंदाताई पांचाळ यांना राज्यस्तरीय जिजाऊ रत्न २०२३चा पुरस्कार जाहीर
बीड / प्रतिनिधी/विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवून ते प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पुढाकार घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या विश्वकल्याण सेवाभावी सेवाभावी महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा सौ.किस्किंदाताई पांचाळ यांना अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय जिजाऊ रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
याबाबत अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राज्य उपाध्यक्ष ह. भ. प. रामेश्वर महाराज कोकाटे यांनी नुकतेच सदरील पुरस्काराची निवड जाहीर केली असून परळी वैजनाथ तालुक्यातील संगम या गावी गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी आठ वाजता सदरील पुरस्काराचे सामाजिक न्याय माझी मंत्री मा.धनंजय मुंडे साहेब यांच्या पत्नी सौ.राजश्रीताई मुंडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे…
मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात येणार आहे. सौ. किस्किंदाताई पांचाळ यांनी आज पर्यंत समाजातील विविध प्रश्नांवर आंदोलने केली असून तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना महामारीच्या संकटात स्वतःचे मंगळसूत्र विकून गोरगरीब जनतेला अन्नदान केले असून समाजातील अनेक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. सौ. किस्किंदाताई पांचाळ यांना राज्यस्तरीय जिजाऊ रत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.