जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद भाबड यांची निवड…

0
108

जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद भाबड यांची निवड…

मालेगाव /प्रतिनिधी/ युसुफ पठाण/आज नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली.

या वेळी झालेल्या चुरशीच्या लाढाईत नांदगाव चे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या नेतृत्वात आमदारांचे खंदे समर्थक प्रमोद भाबड यांची अध्यक्ष पदी निवड झाली.
जिल्हा मजूर संघाच्या संचालक पदासाठी गेल्या महिन्यात निवडणूक घेण्यात आली यावेळी २० जागांपैकी ८ जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित १२ जागांसाठी मतदान घेण्यात आले होते.

आज दि. १० जानेवारी रोजी पार पडलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठी चुरस होती. यात प्रमोद भाबड यांना १२ मते तर इगतपुरी चे ज्ञानेश्वर लहाने यांना ८ मते मिळाल्याने प्रमोद भाबड यांची बहुमताने अध्यक्ष पदी निवड झाली. तसेच संघाच्या उपअध्यक्ष पदी सौ. शर्मिला कुशारे यांची निवड झाली.

या वेळी आमदार सुहास आण्णा कांदे, जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे, विष्णू निकम, नगराध्यक्ष राजेश कवडे, आनंद कासलीवाल, राजेंद्र पवार, योगेश पाटील, राजेंद्र भोसले, केदा आहेर, साईनाथ गिडगे, तेज कवडे, किशोर लहाने, किरण देवरे, मयुर बोरसे, अमोल नावंदर, डॉ. सांगळे, राजेंद्र देशमुख, संजय आहेर, अनिल रिंढे, दशरथ लहिरे, पंकज जाधव, जिल्हा मजूर संघाचे सर्व संचालक मंडळ तसेच उपस्थितांनी प्रमोद भाबड यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here