युवा उद्योजक योगेश भारती यांच्या सत्काराचे १३ जानेवारी रोजी आयोजन : श्री. बजरंग कदम
इसलामपूर (प्रतिनिधी)इकबाल पीरजादे/
घबकवाडी ता. वाळवा येथील युवा उद्योजक श्री. योगेश अशोकराव भारती यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार मिळाल्याबद्दल शुक्रवार दिनांक १३ जानेवारी रोजी सायंकाळी ७:०० वाजता घबकवाडी ता. वाळवा येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते श्री. बजरंग कदम (आण्णा) व श्री. शंकरराव कदम (नाना) यांनी दिनी.
अंधश्रध्दा निर्मूलन वैज्ञानिक दृष्टीकोन समिती तसेच मा. डॉ. प्रताप दिघांवकर प्रेरित बळिराजे आत्मसन्मान संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ हा राज्यस्तीय पुरस्कार घबकवाडी – ओझर्डे येथील युवा उद्योजक श्री. योगेश भारती यांना दिला आहे.
या निमित्ताने घबकवाडी गांवच्या लोकनियुक्त सरपंच मा. संगिता माणिकराव घबक यांच्या शुभहस्ते व गांवचे माजी आदर्श सरपंच श्री. संजय कदम (बापू) यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असुन समारंभास ग्रामपंचायत सदस्य सौ. वंदना दिपकराव खोत, घबकवाडीचे माजी उपसरपंच श्री. महादेव तुकाराम खोत (काका), माजी उपसरंपच श्री. युवराज भारती, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्री. सुनिल भारती, श्री. दिलिप कुंभार, रविंद्र भारती, विजय कदम, भानुदास घबक विकास सोसायटीच्या माजी चेअरमन सौ. नंदाताई कदम, व्हा. चेअरमन हंबीरराव खोत, युवा उद्योजक अमित घबक, यांच्यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.