पोलीस हक्क संरक्षण संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी राजकुमार मुंढे यांची निवड
गंगाखेड – महाराष्ट्र राज्य पोलिस हक्क संरक्षण संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदावर पत्रकार राजकुमार मुंढे यांची निवड संस्थापक अध्यक्ष विनोद भोसले यांनी परभणी येथे झालेल्या बैठकीत केली आहे.
गजानन नगर येथिल मातोश्री गुरूकुल येथे महाराष्ट्र राज्य पोलिस हक्क संघटनेची बैठक घेण्यात आली.या बैठकीला संस्थापक अध्यक्ष विनोद भोसले, सचिव शेषराव सोपणे, जिल्हा अध्यक्ष गोपाळ कच्छवे, यांची प्रमुख उपस्थिती होती.या बैठकीत गंगाखेड तालुका महाराष्ट्र राज्य पोलिस हक्क संरक्षण संघटनेच्या अध्यक्षपदी पत्रकार राजकुमार मुंढे यांची निवड केली. शहर अध्यक्षपदी सुधाकर चव्हाण, तालुका संपर्कपदी सोपानराव टोले यांची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या सर्वाना संस्थापक अध्यक्ष विनोद भोसले यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी जुनी कार्यकारणी बरखास्त केली.