केंद्र अजिजपूरा अंतर्गत शालेय क्रिडा स्पर्धा संपन्न..
बीड, प्रतिनिधी -: दि 10 रोजी मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या आदेशान्वये इयत्ता 6 वी ते 8 वी च्या वर्गातील मुलांच्या केंद्रातर्गत,तालुकातर्गत कबड्डी व खो-खो या खेळांच्या स्पर्धा घेऊन सर्व तालुकातील संघाची निवड करुन जिल्हातर्गत स्पार्धा आयोजन करण्यात यावे.याप्रमाणे केंद्र अजिजपूरा बीड अंतर्गत कबड्डी,खो-खो या खेळाच्या स्पर्धा संपन्न झाल्या.
यात केंद्रातील सर्व 6 वी ते 8 वी च्या शाळेच्या संघानी सहभाग घेतला होता.यात कबड्डी व खो-खो या दोन्ही खेळात जिल्हा परिषद खापरपांगरी या शाळेतील मुला,मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन प्रथम क्रमांक पटकावला.यासाठी शाळेचे मुख्याध्यापक ढाकणे सर व शाळेतील शिक्षीका श्रीमती.मनिषा जगदाळे व श्रीमती.सुनिता शिंदे यानीं मुलांचा सराव घेऊन विशेष परिश्रम घेतल्यामुळे त्यांच्या शाळेच्या संघाला यश मिळून आले.
तसेच मुलांचा कबड्डीचा दुसरा क्रमांक जिल्हा परिषद उर्दू जूनाबाजार या शाळेने पटकावला व तिसर्या क्रमांकाने जिल्हा परिषद प्रा.शाळा बहिरवाडी याशाळेने पटकावला.व मुलींच्या संघात दुसरा क्रमांक बहिरवाडी याशाळेने तर तिसरा क्रमांक उर्दू जूनाबाजार शाळेने पटकावला.या स्पर्धेस ज्येष्ठशिक्षणविस्तार अधिकारी माध्यमिक श्री.भगवानराव सोनवणे यानीं भेट देऊन मुलांना शुभेच्छा दिल्या.या स्पर्धेसाठी जि.प.कन्या मा.शाळेच्या मुअअभिजित तांदळेसर व त्यांच्या शाळेतील शिक्षक लाहानेसर,डोंगरेसर,शेळकेसर व बेग एजाजसर यानीं विशष सहकार्य करत शाळेचे मैदान उपलब्ध करुन
दिले.यास्पर्धा घेण्यासाठी घटक शाळेचे मुख्याध्यापक सोन्याबापू शेंडगे,पोहरेसर अंथरवण पिंपरी तांडा,परमेश्वर हांगेसर गिरामवस्ती,ढाकणेसर खापरपांगरी, ,विठ्ठल पवारसर गवळीवस्ती,उस्मान खान,शेख अब्दुला,मोमीन साजेदसर जूनाबाजार उर्दू, श्रीम.माया सोनवणे जूनाबाजार मराठी,शैलेजा ओहाळा व कांबळे मॅडम बहिरवाडी,चव्हाण मॅडम जिरेवाडी,माने मॅडम वासनवाडी,क्षिरसागर मॅडम धनगरवाडी,मनिषा जगदाळे व सुनिता शिंदे खापरपांगरी,भणगे मॅडम शिवाजीगर मराठी,फरहतबानो शिवाजीनगर उर्दू व रंजना अजबे अजबेवस्ती या सर्व शिक्षक शिक्षीकांनी विशेष परिश्रम घेऊन स्पर्धा यशस्वी केल्या.या स्पर्धेचे आयोजन केंद्रप्रमुख खान अब्दुल रशिद व केंद्रिय मुख्याध्यापक विजयकुमार समुद्रे यानीं केले होते.
विजयी दोन्हि संघस तालुका स्पर्धासाठी शुभेच्छा देण्यात आल्या व शेवटी विजयी संघास प्रमाणपत्र वाटप करुन व ओहाळ मॅडम यानीं सर्वांचे आभार व्यक्त करुन स्पर्धाची सांगत करण्यात आले.