प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिका-यांच्या विरोधात लोकसेना करणार आंदोलन-:ॲड. प्रा. इलियास इनामदार

0
103

प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिका-यांच्या विरोधात लोकसेना करणार आंदोलन-:ॲड. प्रा. इलियास इनामदार.

बीड प्रतिनिधि: 18 डिसेंबर हा दिवस जागतिक स्तरावर अल्पसंख्याक हक़ दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या भारतात व भारतातील तमाम राज्यात व जिल्ह्यात पण हा दिवस मोठ्या हर्षोल्लासाने साजरा केला जातो या दिवशी जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन व राष्ट्रीय स्तरावर विविध स्वंयसेवी संस्था सामाजिक संघटना लोकप्रतिनिधि सामाजिक कार्यकर्ते-नेत्यांसोबत शासन-प्रशासन समाजाच्या विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, रोजगार, संरक्षण, न्याय, आरोग्य या विषयावार चर्चा करण्याचा प्रयत्न करतो अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नावर समस्यावर चर्चा केली जाते त्यावर तोडगा काढ़ण्यात येतो पण यावर्षी बीड जिल्हाधिकारी यांना यादिवसाचा चक्क विसर पड़ला आहे अशा विसर पडणा-या जिल्हाधिकारी यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी 26 जानेवारीला प्रजासत्ताकदिनी लोकसेना आंदोलन करणार अशी माहिती लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी प्रसिद्धि माध्यमाद्वारे दिली आहे. लोकसेना संघटनेची जिल्हाधिकारी यांना मागणी आहे की लोकसेना संघटना व विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षान्नी मागील वर्ष भरामध्ये अल्पसंख्याक समाजाविषयी जेजे निवेदने अर्ज दिलेले आहे जसे उर्दू बालवाड़ी प्रश्न, मुलींचे वस्तीगृह, अल्पसंख्यांक कल्याण समिती गठीत करण्यात यावी, प्रधानमंत्री 15 सूत्री कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. परळी शहरातली अल्पसंख्यक मुली व मुलांचा वसतिगृह लवकरात लवकर सुरु करा, उर्दु घर मंजूर होऊ 6 महिने झाले तरी प्रशासन या बाबत उदासीन आहे,, जूनी तहसिलच्या जागेवर उर्दु घर तयार करा. फारसी व उर्दू भाषेतील महसूली कागदपत्रे मराठी भाषांतर करण्यासाठी जाणकार कर्मचारी नियुक्त करा, अल्पसंख्याक विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रश्न, मौलाना आज़ाद आर्थिक विकास महामंडळाच्या बजेट मध्ये वाढ, वक़्फ़ बोर्ड प्रश्न, जातीचे प्रमाणपत्र समस्या, जात वैलिडिटी समस्या याविषयावर आपण म्हणजेच जिल्हा प्रशासनाने व शासनाने काय उपाययोजना केल्या किती अर्ज निकाली काढले शासनाला कोणते पाठपुरावे केले व पुढील वर्षासाठी आपण आपल्या स्तरावर कोणकोणते उपाययोजना अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी करणार कोणत्या विषयावर शासनाला प्रस्ताव पाठवणार हे अल्पसंख्याक हक्कदिना बाबतीत घेण्यात यावी नसता. लोकसेना संघटना येणाऱ्या 26 जानेवारीला प्रजासत्ताकदिनी बीड जिल्हाधिकारी यांचा अल्पसंख्याक समाजा प्रति हलगर्जीपणा म्हणून धरणे आंदोलन करणार अशी माहिती लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार, खैसर बेग, सुफियान मणियार, ॲड. कलीम काज़ी, मौलाना ज़फर काज़ी, अयाज़ अखतर, शेख समीर, इत्यादीन्नी
प्रसिद्धी माध्यमाद्वारे दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here