्सिल्लोड येथे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा वाढदिवसा निमित्त लाडू तुला व नागरी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न..
सिल्लोड/ प्रतिनिधी/अंधारी ता. सिल्लोड येथे विठ्ठल पा. तायडे मित्र मंडळाच्या वतीने कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा वाढदिवसानिमित्त लाडू तुला व नागरी सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
माझ्या जीवनात मला मित्र जणांची भक्कम साथ लाभली त्यांचे प्रेम व सहकार्य माझ्यासाठी कायम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सत्काराला उत्तर देतांना केले.
सत्कार सोहळा नंतर अंधारी येथील साईबाबा मंदिर परिसरात भाविकभक्तांसाठीच्या सिमेंट बाकांचे लोकार्पण तसेच आमदार चषक अंतर्गत आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले.
यावेळी जि.प.माजी उपाध्यक्ष केशवराव पा. तायडे , जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, न.प.गटनेता नंदकिशोर सहारे, सुनील पाटणी , अजीज बागवान यांच्यासह विठ्ठल पा. तायडे, अब्दुल रहीम, जयवंता गोरे,लक्ष्मण तायडे, धैर्यशील तायडे, अण्णा पांडव,डॉ. मनोहर गोरे, लक्ष्मण गोरे, नारायण जाधव, युनूस पटेल, भिकन तायडे, श्यामभाऊ सोनवणे, कैलास सोनवणे,सचिन गोरे, कैलास खराते, आरेफ कुरेशी, भानुदास तायडे, सुदाम तायडे, मधुकर तायडे, बाळू थोरात आदिंसह अंधारी गावातील गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.