एस के पी ग्रुप व सुजा स्पोर्टिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने.रिपोर्टर कप 2023 फुटबॉल स्पर्धेस डॉ.ज्योतीताई विनायकराव मेटे यांची सदिच्छा भेट.
बीड/ प्रतिनिधी/बीड शहरात आयोजित केलेल्या एस के पी ग्रुप व सुजा स्पोर्टिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरील रिपोर्टर कप 2023 फुटबॉल स्पर्धेस डॉ.ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी काल सदिच्छा भेट देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.आयोजकांच्या वतीने सय्यद इम्रान यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
या प्रसंगी त्यांच्या समवेत शिवसंग्रामचे ज्येष्ठ नेते प्रभाकरअप्पा कोलंगडे, जिल्हाध्यक्ष नारायणदादा काशीद, युवक जिलहाध्यक्ष रामहरीभैया मेटे, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, सुहास पाटील, अल्पसंख्यांकचे ज्येष्ठ नेते शेख अखिलभाई, अल्पसंख्यांकचे शहराध्यक्ष अमजद पठाण,शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, ज्ञानेश्वर कोकाटे,आयुबखान पठाण,महिला आघाडीचे जिल्हाध्यक्षा अँड.मनिषाताई कुपकर, महिला आघाडीचे जिल्हा सरचिटणीस साक्षीताई हांगे,गेवराई महिला आघाडी तालुकाध्यक्षा साधनाताई दातखिळ, महिला आघाडी बीड शहर उपाध्यक्षा संगीताताई ठोसर, माजी सभापती मनीषाताई कोकाटे,रेखाताई तांबे,निशाताई यादव हे उपस्थित होते.