प्रभाग क्र.24 चा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न स्थानिक नगरसेवक मोरे, बनसोडे यांनी कायमस्वरुपी संपवला

0
101

प्रभाग क्र.24 चा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न स्थानिक नगरसेवक मोरे, बनसोडे यांनी कायमस्वरुपी संपवला

बीड (प्रतिनिधी)-  प्रभाग क्र 24 मध्ये गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर व युवा नेते योगेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास  कामे नगरसेवक भैय्यासाहेब मोरे व नगरसेवक रंजीत बनसोडे यांनी कामे केली अशातच पाणीप्रश्नी लक्ष घालत नळजोडणी, जलकुंभ उभारणीचे कामे करुन नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय करत नगरसेवक रंजीत बनसोडे, नगरसेवक भैय्यासाहेब मोरे यांनी मुलभूत प्रश्न सोडवला आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील नगरसेवक भैय्यासाहेब मोरे, रंजीत बनसोडे हे  नगरसेवक सातत्याने प्रभागातील विकासकामाचा पाठपुरावा करत असतात व नागरिकांच्या तक्रारी सोडवत असतात अशातच अलीकडच्या काळात त्यांनी प्रभाग क्र.24 अमृत योजने अंतर्गत पाईपलाईन, नळ जोडणी,जलकुंभ उभारणी, नगर परिषद हद्दवाढ परिसरामध्ये आवश्यक त्या ठिकाणी पाईपलाईन टाकून घेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवत, अमृत योजनेचे काही पाइपलाइन सुरु करुण घेतल्या, व राहिलेल्या  देखीलपुढील तप्यात सुरु करण्यात येतील नागरिकांना काही दिवसा नंतर पाण्या सदभात अडचण येणार नसल्याचे पत्रकाद्वारे कळविले आहे.त्यामुळे नागरिकातून नगरसेवकांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here