जिंतूरात युवकाने गळफास घेऊन आत्महत्या खैरी प्लॉट परिसरात घडली घटना

0
111

जिंतूरात युवकाने गळफास घेऊन आत्महत्या

खैरी प्लॉट परिसरात घडली घटना..

 

जिंतूर, प्रतिनिधी माबूद खान/जिंतूर शहरातील खैरी प्लॉट परिसरातील युवकांनी स्वतःच्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 16 जानेवारी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली असून घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत. शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

जिंतूर शहरातील खरी प्लॉट परिसरात राहणाऱ्या विवाहित गजानन खिराप्पा हदरगे वय ३२ वर्ष या युवकांनी १५ जानेवारी मध्यरात्री च्या सुमारास स्वतःच्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडल्याची माहिती माजी नगरसेवक मनोहर डोईफोडे, संतोष चौधरी, संदीप लकडे, आदींनी पोलीस निरीक्षक विलास कोकाटे यांना देताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक विलास कोकाटे व त्यांच्या पथकाने येऊन आत्महत्याग्रस्त युवकाला नागरिकांच्या मदतीने काढून घटनास्थळी प्राथमीक पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रुती कोटगिरे यांनी तपासून त्यास मृत घोषित केले

आत्महत्याग्रस्त युवक हा वसमत तालुक्यातील असून मागील अनेक वर्षापासून तो जिंतूरात सासुरवाडी असल्याने तो स्वतः च्या पत्नी,एक मुलगा एक मुलगी परिवार सोबत राहत होता. एका खाजगी दुकानात काम करत होता नेमके आत्महत्याचे कारण समजू शकले नाही आत्महत्या केल्याने खैरी प्लॉट परिसरात एकच शोककळा पसरली आहे बातमी देईपर्यंत जिंतूर पोलिसात नोंद झालेली नव्हती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here