माहिती अधिकारात माहिती न देणाऱ्या नगरपंचायतसमोर धरणे आंदोलन

0
118

माहिती अधिकारात माहिती न देणाऱ्या नगरपंचायतसमोर धरणे आंदोलन

 

 

पाटोदा / प्रतिनिधी/प्रशासनात पारदर्शक कारभार रुजावा आणि त्याचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना व्हावा, यासाठी देशात लागू झालेल्या माहिती अधिकार कायद्यास पाटोदा नगरपंचायत प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जात असल्याने माहीती अधिकार चळवळीतील कार्यकर्त्यांचे पाटोदा नगरपंचायत समोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले.

पाटोदा नगरपंचायत प्रशासन गेल्या १ वर्षापासून माहितीच्या अधिकारात माहिती देत नसुन याबाबतीत वेळोवेळी अपील फेर अपील करूनही माहीतीच्या अधिकाराला केराची टोपली दाखवली जात असल्याने याविरोधात दि.३ जानेवारी रोजी निवेदन सादर करत आंदोलनाचा इशारा देऊन ही निगरगट्ट झालेल्या नगरपंचायत प्रशासनाने कोणतेही ठोस पाऊले उचलली नसल्याने दि.१६ जानेवारी सोमवार रोजी लक्षवेधी आंदोलन सुरू करण्यात आले. तत्पूर्वी सोमवार दिवस शासकीय कार्यालयाचा पहिला दिवस असुनही १२ वाजेपर्यंत मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलनकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात केली. यावेळी ताहेर चाऊस,उद्धव राख, तोसिफ शेख (जनता),अमोल नाईकनवरे,सदाशिव नाईकनवरे, किशोर राख,महंमद चाऊस, वसिम मोमीन, बाळासाहेब जावळे,आदीं सहभागी झाले होते.उशिरा आलेले नगरपंचायतचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत ८ दिवसांत प्रकरण निकाली काढण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर सदरील आंदोलन स्थगित करण्यात आले.

Pathan E Hind Team


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here