फरीद सिराजोद्दीन देशमुख यांची मुंबई येथे महाराष्ट्र काँग्रेस कमिटी चे प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले साहेब यांची भेट..
बीड/ प्रतिनिधी/ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा लातूर शहर सह प्रभारी फरीद सिराजोद्दीन देशमुख यांच्या कुशल नेतृत्व मध्ये मराठवाडा स्तरीय काँग्रेस चे विचारधारा गाव पातळीवर नवीन मोर्चे बांधणी व काँग्रेस मजबूत करण्यासाठी संघटनचा निर्माण करण्यासाठी ते अहोरात्र परिश्रम करीत आहे
काँग्रेसच्या नवतरुण कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे काम मराठवाड्यातील तरुण तडफदार युवा नेते फरीद देशमुख हे आपल्या कार्यकर्त्यां सोबत मराठवाड्याच्या नवीन रूपरेषा ठरविण्या साठी वेग वेगळ्या जिल्ह्यात जिल्हास्तरीय मिळावे आयोजित करून त्या भागातील समस्येवर तोडगा काढण्याचे प्रयत्न करीत आहे
मुंबई येथे महाराष्ट्राचे पक्षश्रेष्ठी काँग्रेस कमिटी चे प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले साहेब यांची भेट घेऊन मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकी सह इतर मुद्यांवर चर्चा करतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सचिव तथा लातूर शहर सह प्रभारी फरीद सिराजोद्दीन देशमुख दिसत आहेत. या वेळी त्यांच्या समवेत नईम देशमुख व इतर काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.