स्वामी  रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची पळवापळवी

0
128

स्वामी  रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची पळवापळवी

 

अंबाजोगाई –: प्रतिनिधी /फेरोज बाबा/स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाची पळवापळवी होत असून रुग्णांची आर्थिक लूट केली जात आहे.

शहरात स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अनेक डॉक्टरांचे त्यांच्या पत्नी किंवा नातलगाच्या नावावर टोलेजंग असे खाजगी हॉस्पिटल आहेत. नियमाला रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णास स्वतःच्या खाजगी हॉस्पिटलचा पत्ता देत तेथे बोलावून रुग्णांची आर्थिक पिळवणूक करतात.स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात सर्व प्रकारच्या उपचार सुविधा उपलब्ध असताना रुग्णास उपचारासाठी स्वतःच्या खाजगी हॉस्पिटल मध्ये रेफर करण्याची गरज काय ? शासकीय सेवेत असणारे काही डॉक्टरच रुग्णांची पळवापळवी करत असतील तर सर्व सामान्यांसाठी जीवनसंजीवनी असणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचा काय उपयोग अश्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

Pathan E Hind Team


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here