इकरा च्या चार खेळाडूंची आंतर विद्यापीठ हॉकी स्पर्धे साठी निवड
जळगाव /प्रतिनिधी/इकरा शिक्षणं संस्था संचलित एच जे थीम कला व विज्ञान महाविद्यालय मेहरून जळगाव च्या चार खेळाडूंची आंतर विद्यापीठ हॉकी स्पर्धे साठी क ब चौ उमवि च्या हॉकी संघात निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धा दिनांक १८/०१/२०२३ ते २४/०१/२०२३ पर्यंत आय. टी. एम.ग्वाल्हेर येथे आयोजित आल्या आहेत. खेळाडूंना महाविद्यालय चे क्रिडा संचालक प्रा डॉ चांद खान सफदर खान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या निवडी बद्दल इकरा शिक्षणं संस्थेचे अध्यक्ष डॉ अब्दुल करीम सालार , डॉ इकबाल शाह, एजाज अब्दुल गफार मलीक, तसेच इतर पदाधिकारी, तसेच प्राचार्य प्रा आय एम पिंजारी, डॉ युसुफ पटेल, प्रा. डॉ वकार शेख,प्रा.डॉ.इरफान बशीर, डॉ. मुस्तकीम बागवान, श्री अश्फाक पठाण, श्री प्रभाकर गांगवे, श्री कामिल शेख, सर्व प्राध्यापक बंधू भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनीही खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
निवड झालेल्या खेळाडूंचे नाव खालील प्रमाणे आहे. १) शेख इम्रान शेख बिस्मिल्ला,२) शेख आदिल शेख अफसर,३) उमेर खान, अंवरखान ४) सय्यद शादाब अली, यांची निवड करण्यात आली आहे.