Home मराठवाडा बीड काकडहिरा येथे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा संपन्न..
बीड, प्रतिनिधी- : तालुक्यातील काकडहिरा येथे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा आणि हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
या प्रसंगी डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी उपस्थित राहुन सरपंच, सदस्यांचा सत्कार करून महिला भगिनींशी संवाद साधला. यावेळी सरपंच सौ.प्रिती अमोल बागलाने, उपसरपंच सौ.रत्नमाला जीवन बागलाने, सौ.अनिता उध्दव बागलाने, सौ.राधाबाई सदाशिव बागलाने, सौ.लक्ष्मी श्रीकांत बागलाने, सौ.सविता बळवंत बागलाने, सौ.मिनरा नामदेव बागलाने, सौ.अनिता प्रकाश बागलाने यांच्यासह महिला भगिनींची उपस्थिती होती.