मुंबई .मातोश्रीवर शेख निजाम यांनी आज मा. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बांधले शिवबंधन..
शेख निजाम यांच्या शिवसेना प्रवेशने बशीरगज बीड येथे फटाके वाजून जल्लोष..
बीड जिल्ह्यातील शिवसेने मध्ये मोठी इनकमिंग झाली सुरू
शेख निजामच्या शिवसेना प्रवेशाने बीड जिल्ह्यातील मुस्लिम समाजाचे राजकारणाचे समीकरण बदलणार
बीड, दि.२१ (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यातील एमआयएम, शिवसंग्राम आणि संभाजी ब्रिगेड या तिन्ही संघटनेतील पदाधिकार्यांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे सचिव तथा खासदार अनिल देसाई, खा.अरविंद सावंत, उपनेत्या सुषमा अंधारे, संपर्कप्रमुख धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख अनिल जगताप हे उपस्थित होते.
बीड जिल्ह्यात शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरू झाली आहे. आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून असंख्य पदाधिकार्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष शेख निजाम जैनुद्दीन, शिवसंग्रामचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन धांडे, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष संतोष जाधव, शिवसंग्रामचे उपाध्यक्ष नंदकिशोर पिंगळे, कामखेडाचे माजी सरपंच अय्युब पठाण, माजी नगरसेवक हाफीज शेख आश्पाक, माजी नगरसेवक शेख अमर, माजी नगरसेवक समियोद्दीन इनामदार, एमआयएमचे माजी शहराध्यक्ष मोमीन जुबेर, एमआयएमचे युवक जिल्हाध्यक्ष शेख खय्युम इनामदार, सामाजिक कार्यकर्ते जयंत वाघ, शेख खदीर, शेख नजीर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी शामराव पडुळे, सुनील अनभुले, नितीन धांडे, गोरख सिंघण , सुनिल सुरवसे ,अभिजित बरिदे, सखाराम देवकर, चंद्रसेन काळे हे ही उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाप्रमु्ख अनिल जगताप यांनी अजून असंख्य प्रवेश होणार असून शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक पदाधिकारी इच्छुक असल्याचे सांगितले.