मन्सुर भाईच्या कार्यालयात सर्वसामान्यांच्या आडचणी दुर होतील याची गवाही देतो -आ .लक्ष्मण पवार
पवारांच्या हस्ते साठेनगर येथिल कार्यालयाचा उद्घाटन व 107 लोकांचा भाजपात प्रवेश
गेवराई ( प्रतिनिधी )
गेवराई शहरातील साठेनगर येथिल शेख मन्सुर भाऊ यांच्या भाजपा संपर्क कार्यालयाचे आ.पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच मन्सुर भाऊ यांच्या 107 सहकाऱ्यांचा
आ.लक्ष्मण पवार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.
यावेळी जेडी शहा, माजी नगराध्यक्ष ब्रम्हदेव धुरंधरे,
बांधकाम सभापती राहुल खंडागळे, नगरसेवक अप्पासाहेब कानगुडे, नगरसेवक भरत गायकवाड, नगरसेवक याहिया खान,युवा नेते बाळासाहेब सानप,नगरसेवक मुन्नासेठ,शेख उस्मान,शेख हाशम भैय्या,मनोज हजारे, बाळासाहेब गायकवाड,संजयभाऊ सुतार, कमलाकर हातागळे, पत्रकार अनिल आगुंडे, पत्रकार शेख हारुन ,दिपक दादासाहेब गिरी ,बाबासाहेब घोडके, रंजित डरपे, समाधान मस्के, मुकेश महाजन,मोहन राखुंडे , सय्यद ईमरानभाऊ,अशोक गायकवाड,मतिन कुरैशी, रंजित खाजेकर,शेख राजू, किरण गायकवाड,अक्षय पवार,करण सुतार ,संतोष सुतार,सादेक चाचु,आकाश खाजेकर
सह आदी मान्यवरांची उपस्थिती होती भाजपा संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी व कार्यकर्त्यांच्या प्रवेश प्रसंगी
बोलताना आ.पवार म्हणाले की गेवराई मतदारसंघ माझ कुटुंब आहे आणी आपल्या या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी मी घेत आलो आहे आणी या नंतरही घेत राहणार तसेच गेवराई शहरासह ग्रामीण भागातील राष्ट्रवादी, शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश करत आहे भाजपात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे मी स्वागत करतो जुन्या व नव्या कार्यकर्त्यांनी सोबत राहुन आप आपल्या भागातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर रहावे तसेच शेख मन्सूर यांनी साठेनगर भागात भाजपा संपर्क कार्यालय उघडले आहे याठीकाणी याभागातील नागरिकांच्या लाईट ,पाणी,राशन, निराधार योजने सह अन्य कोणत्याही समस्या असतील त्या या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून शेख मंन्सुर सोडवण्यांचा प्रयत्न करतील हे संपर्क कार्यालय सर्व सामान्याच्या मदती साठी असल्याचं आ.पवार यांनी सांगितले