ईखरा ऊर्दु शाळा व बागवान फाउंडेशनच्या वतीने आरोग्य शिबिर कार्यक्रमात संपन्न.
आरोग्य हिंच खरी संपत्ती – बिलाल बागवान..!
मानवत / प्रतिनिधी :-अहमद अन्सारी /
आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःचे आरोग्याकडे मानव दुर्लक्ष करत आहे
आरोग्य हीच खरी संपत्ती मानली तरच आपण निरोगी जिवन जगु शकतो खाणपान बिघडल्यामुळे आपण कोणत्याही आजाराला बळी पळत आहोत
आयुष्यात मोठ्या आजाराला समोर जावं लागत आहे आपल्याला अश्या आजारापासून मुक्ती मिळावी यासाठीच असे छोटे-मोठे आरोग्य शिबिराचे आयोजन बागवान फाउंडेशनच्या च्या मार्फत केले आहे
अशी प्रतिक्रिया बागवान फाउंडेशनचे बिलाल बागवान यांनी दिली ते ईखरा ऊर्दु शाळा गालीब नगर येथील बागवान फाउंडेशनच्या आरोग्य शिबिर कार्यक्रमात बोलत होते.
मानवत येथे दिनांक २२ जानेवारी रोजी ईखरा उर्दू शाळा गालिब नगर येथे बागवान फाउंडेशनच्या वतीने मुक्ती मोहम्मद इसाक सहाब यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर चे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे बागवान समाजाचे अध्यक्ष अब्दुल रहीम संदलजी हे होते या शिबिरामध्ये परभणी येथून डॉ. सय्यद रय्यान, डाॅ अब्दुल रहेमान,डाॅ रहेमत आलम सिद्दिकी,डाॅ.अब्दुल सलाम तांबोळी, तसेच मानवत चे डॉ अमोल पातेकर, डॉ.सय्यद अलिम, डॉ.जुबेर खान, डॉ.हनिफ खान, उपस्थिती होती.सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात मौलाना मुजाहिद यांनी दिव्य कुराण वाचून केली
कार्यक्रमाचे प्रस्तावित अँड. लुकमान बागवान यांनी केले.
सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक सिराज अली खान यांनी केले
या शिबिरामध्ये तब्बल पाचशे लोकांची तपासणी करण्यात आली व त्यांना औषधे मोफत देण्यात आले मोतीबिंदू काचबिंदू या रुग्णांवर अल्प दरामध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. आभार प्रदर्शन डॉ. एम. ए. रिजवान सर यांनी मानले.
या आरोग्य शिबिरास यशस्वी करण्यासाठी रफिक रहिम बागवान ,अब्दुल वहाब बागवान ,मतीन बागवान, शाहिद बागवान, इदरीस बागवान, जावेद बागवान,गुफरान बागवान, इक्बाल बागवान, फइम बागवान ,अतिक बागवान,रशिद बागवान,नविद बागवान,अकबर बागवान, इमरान बागवान,हफिज बागवान,नसिर बागवान, रफिक रज्जाक बागवान आदिनी परिश्रम घेतले या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला.