सादिया गुलाब अत्तार हीचा BHMS साठी निवड झाल्याने तिचा अत्तार वेलफेअर ट्रस्ट च्या वतीने सत्कार…संपन्न
अत्तार वेल्फेट ट्रस्टच्या वतीने रिक्षा चालकाची मुलगी हीचा BHMS साठी निवड झाल्याने तिचा सत्कार
बीड (प्रतिनिधी)बीड अत्तार समाजातिल रिक्षा चालकाची मुलगी सादिया गुलाब अत्तार हीचा BHMS साठी निवड झाल्याने तिचा अत्तार वेलफेअर ट्रस्ट च्या वतीने सत्कार करण्यात आला.
आतार वेलफेअर ट्रस्ट च्या वतीने मागील अनेक वर्षापासून समाज च्या अनेक प्रश्नावर मार्ग काढणे व समाज हितासाठी कार्य करणे अशा अनेक कामांमध्ये अग्रेसर असलेली संघटना व संघटनेचे माध्यमातून शैक्षणिक आर्थिक सामाजिक क्षेत्रामध्ये नावलौकिक केलेले लोकांचे सत्कार करून त्यांचं मनोबल वाढविण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून केले जात आहे
या वेळी अत्तार वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष आबेद सेठ अत्तार, जनरल सेक्रेट्री अकबर अत्तार, नासेर अत्तार, गयाज अत्तार, परवेज अत्तार अनिस भाई, हाफीज रहीम, राइस अत्तार, मौलाना तारीख अन्वर,हाफीज युनूस सह आदी दिसत आहे.