जिल्हा व शहर कराटे डो असोसिएशनच्या खेळाडूंचे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये वर्चस्व…
कायमऋ षिकेश बेदरे, पवन जोगदंड यांनी पटकावले कांस्यपदक
बीड (प्रतिनिधी): येथील जिल्हा व शहर कराटे डो असोसिएशनचे खेळाडू ऋषीकेश बेदरे, पवन जोगदंड या दोन खेळाडूंनी बारामती येथे खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत कराटे स्पर्धेत जिल्ह्याच्या नावाचा लौकिक वाढवून या स्पर्धेत जिल्हा व शहर कराटे डो असोसिएशनचे वर्चस्व कायम ठेवत कांस्य पदक पटकावून नेत्रदिपक यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत असोसिएशन च्या वतीने रोहन नेमाणे, अर्जुन थिगळे, ऋषीकेश बेदरे, पवन जोगदंड यांनी बीड जिल्ह्याच्यावतीने सहभाग नोंदवला होता. ऋषीकेश बेदरे व पवन जोगदंड या खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट प्रदर्शनाबद्दल नुतन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी त्यांचे कौतुक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
दि. 13 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2023 रोजी संपन्न झालेल्या बारामती येथे क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद पुणे व महाराष्ट्र कराटे असोशियन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय 2022-23 कराटे स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल बारामती या ठिकाणी संपन्न झाल्या.
या स्पर्धेत बीड येथील जिल्हा व शहर कराटे-डो असोसिएशनचे खेळाडू रोहन नेमाणे, अर्जुन थिगळे, ऋषीकेश बेदरे, पवन जोगदंड यांनी आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत ऋषिकेश बेद्रे याने 19 वर्षाखाली तसेच पवन जोगदंड यांनी 17 वर्षाखाली वयोगटांमध्ये आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत घवघवीत यश संपादन केले.
या दोन्ही खेळाडूंनी या कास्यपदक पटकावून बीड जिल्ह्याच्या नावाचा लौकिक वाढविला आहे. या खेळाडूंना जिल्हा व शहर कराटे डो असोसिएशनचे अध्यक्ष व प्रशिक्षक उत्तरेश्वर जगन्नाथ सपाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंना त्यांच्या यशाबद्दल बीडच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख तसेच वरिष्ठ लिपिक वैभव करांडे सर, रामदास गिरी, माजी सैनिक खंडू जगताप, अॅड. अमित वाघमारे डॉ.नितीन सोनवणे यांनी वरील खेळाडूंची कौतुक अभिनंदन केले