प्रमिला देवी पाटील महाविद्यालयात पदवीदान समारंभ संपन्न
कठीण परिश्रमातून यशाचे उच्च शिखर गाठता येते.
-श्रीमती सुनिता कानडे (मुळे).
नेकनूर /प्रतिनिधी/प्रमिलादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय नेकनूर येथे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आयोजित पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नेकनूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री विलास हजारे हे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नेकनूर नगरीची कन्या श्रीमती सुनीता कानडे (मुळे) सहाय्यक विक्रीकर निरीक्षक बीड या उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री तुळजीराम शिंदे, तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य दादासाहेब मोटे यांची उपस्थिती प्रार्थनीय होती.
सर्व प्रथम आलेल्या पाहुण्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या देण्यात आलेल्या नियमालीनुसार विविध प्रकारचे स्कार्फ घालून मिरवणूक स्वरूपात सांस्कृतिक विभागात पाहुण्यांचे आगमन करण्यात आले. तदनंतर आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत गीताने कुमारी संध्या आरण हिने सुंदर असे स्वागत गीत गायले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक या समितीचे सदस्य डॉ. कांतराव कलाणे यांनी कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला ना विद्यापीठात जाता आले ना महाविद्यालयात येता आले म्हणून आज आम्ही या ठिकाणी हा पदवीदान समारंभ घेत आहोत असे म्हटले. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून नेकनूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विलास हजारे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना आजच्या युगामध्ये वावरत असताना मोबाईल पासून दूर राहणे काळाची गरज बनलेली आहे,
तसेच एमपीएससी यूपीएससी चा अभ्यास विद्यार्थ्यांनी केल्यास स्वयं आद्ययनातून आज सर्जनशील व्यक्ती घडू शकतो असे याप्रसंगी मत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या श्रीमती सुनिता कानडे मॅडम यांनी आपल्या भाषणातून जीवनात आलेल्या खडतर प्रवासाचे वर्णन त्यातून मार्ग काढत विक्रीकर निरीक्षक सारख्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन आपल़े जीवन कसे सार्थक बनवले हे विद्यार्थ्यांना सांगितले. तर कला शाखेतून तीन-तीन परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवून कसल्याही प्रकारचे क्लासेस न लावता स्वयं अध्ययनाला महत्त्व दिले.व मी यशाचे शिखर गाठले असे सांगितले. तर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री तुळजीराम शिंदे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी गोडी निर्माण करण्यासाठी व पदवीपर्यंत पोहोचण्यासाठी जो प्रवास आहे तो प्रवास मृगजळ सारखा आहे, परंतु त्यातून आपल्याला अभ्यासातून मार्ग काढावा लागतो आणि मार्ग काढल्यानंतरच निश्चित यश प्राप्त होते असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दादासाहेब मोटे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नियमावलीनुसार आजचा हा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन दोन्ही मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले आणि जो विद्यार्थ्यांना मार्ग दाखवला त्याचे अनुकरण निश्चित महाविद्यालयाचे विद्यार्थी करतील असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी व रिपोर्टरचे पत्रकार श्री अमजद पठाण तसेच सिटीझन चे सय्यद आर्शद इत्यादी आवर्जून उपस्थित होते. पदवीदान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीदान विभाग प्रमुख व माजी विद्यार्थी कमिटी प्रमुख प्रा.मुजावर एस.टी. यांनी केले तर उपस्थितांचे आभार याच समितीचे सदस्य डॉ.कृष्णा जाधव यांनी मानले. या कार्यक्रमासाठी 2017 ते 2021 या कालावधीतले माजी विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, पत्रकार इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.