दिव्य कुराण पठण स्पर्धा मरकज मस्जिदेत संपन्न
सर्व मानवजातीला दिशा,शांतीचा मार्ग दाखविण्याची किमया दिव्य कुराणातच:-मुफ्ती अब्दुल मुक्कीम इशाती
पाटोदा / प्रतिनिधी/पाटोदा शहरातील मरकज मस्जिद मध्ये दि.१४फेब्रुवारी मंगळवार रोजी दुपारी जोहर ते मगरीबच्या दरम्यान दिव्य कुराण पठण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.ही स्पर्धा मुफ्ती अब्दुल मुक्कीम इशाती बीड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली असुन स्पर्धेत प्ररिक्षक म्हणून मुफ्ती कौसर साहाब,मौलाना जाबीर साहाब,कारी आसिफ साहाब लाभले होते. या स्पर्धेत पाटोदा तालुक्यातील विविध मस्जिद,आशुरखाणे आदी ठिकाणी दिव्य कुराण पठण करित असलेल्या
8 ते 12 वयोगटातील 25 मुलां मुलांनी भाग घेतला असुन
या स्पर्धेत निवड करण्यात आलेल्या मुलांना इशाच्या नमाज नंतर मुफ्ती अब्दुल मुक्कीम इशाती बीड यांच्या हस्ते प्रोत्साहनपर बक्षीसे देण्यात आली.यावेळी मुफ्ती अब्दुल मुक्कीम इशाती बीड यांनी मार्गदर्शन करतांना सर्व मानवजातीला दिशा तसेच शांतीचा मार्ग दाखविण्याची किमया दिव्य कुराणातच असल्याने लहान मुलांमध्ये दिव्य कुराणा प्रती लालसा निर्माण व्हावी हा प्रमुख उद्देश ह्या स्पर्धेचा असुन ह्या स्पर्धेत निवड करण्यात आलेल्या मुलां मुलींना येणाऱ्या काळात जिल्हा तसेच महाराष्ट्र लेवलवर सुध्दा स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे मानस मुफ्ती अब्दुल मुक्कीम इशाती बीड यांनी उपस्थितांना सांगितले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मौलाना अल्ताफ मरकज मस्जिद, मौलाना सईद,हाफिज युनुस,मौलाना हाकिम,हाफिज नेहाल आदींनी परिश्रम घेतले.यावेळी पाटोदा शहरातील सर्वच वयोगटातील नागरिक उपस्थित होते.