आंधळी हायस्कूल मध्ये विविध उपक्रमांनी शिवजयंती उत्साहात संपन्न
इसलामपूर /प्रतिनिधी/इकबाल पीरज़ादे/
आंधळी येथील हिंदकेसरी गणपतरावआंधळकर हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक जयवंत मोहिते यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून छत्रपतींच्या पराक्रमाचा आढावा घेऊन ते जाणता राजा व रयतेचा राजा होते व त्यांनी बहुजनांना समान हक्क व न्याय मिळवून दिला.त्यांचा हा वसा व वारसा आजच्या पिढीने जपून समाज व देशहितासाठी कार्यरत राहिले पाहिजे असे विचार मांडले.
या वेळी अक्षरा जाधव,हर्षदा माने,धनश्री माने,सत्यजीत पाटील, हर्षद गुरव, श्रावणी जाधव आदी विद्यार्थांनी मनोगत, पोवाडा,राज्यगीत तर धर्मराज चौधरी,रमेश गायकवाड, धिरज बंडगर,उत्तम शिंदे,राहुल पाटील,समीर कोळेकर यांनी आपले विचार मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश माने यांनी तर आभार अमर पाटील यांनी मानले.कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, सचिव नरेंद्र पाटील, संचालक नानासो माने,यशवंत माने यांनी सर्वांचे अभिनंदन केले.