पौष्टिक कडधान्य म्हणून ज्वारी उपयुक्त – मंजुषा जामगे
गंगाखेड , राजकुमार मुंडे -: पौष्टिक कडधान्य म्हणून ज्वारी उपयुक्त असुन सर्व पोषक तत्व आणी लोह मिळून शरीरातील चयापचय सुधारण्याचे कार्य करते.लाह्या, कण्या, अंबिल, पिठाच्या भाकरी करून खाण्यासाठी ज्वारी वापरली जाते.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य महत्त्व व फायदे याची जनजागृती करण्यासाठी २०२३ हे वर्ष समर्पित केले आहे.या पौष्टिक धान्यापैकी ज्वारी हे पिक असल्याने यावर जनजागृती करण्यात येत आहे.असे प्रतिपादन दि.१९ फेब्रुवारी रोजी पंचायत समितीच्या माजी उपसभापती मंजुषा जामगे यांनी केले.
तालुका कृषी कार्यालयाने फेब्रुवारी हा महिना रब्बी हंगामातील ज्वारी पिकाचे महत्त्व व जागृती करण्यासाठी समर्पित केला असल्याने ज्वारी उत्पादक शेतक-याच्या शेतावर जाऊन ज्वारीवर जनजागृती करण्यात येत आहे.
या निमित्त परभणी रोडवरील शेतात रविवारी जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक
म्हणून पंचायत समितीच्या उपसभापती मंजुषा जामगे यांची उपस्थिती होती.यावेळी मंडळ कृषी अधिकारी शितल पौळ, माजी नगरसेविका प्रतिभा वाघमारे, माधुरी राजेद्र, कामगार महिला जिल्हाध्यक्ष रूक्मीन लटपटे आदीची उपस्थिती होती.
पुढे बोलताना मंजुषा जामगे
म्हणाल्या ,की ज्वारीचा हुरडा हा पौष्टिक तत्वात येतो.हुरड्याचे ग्रामिण भागात खुप महत्त्व मानले जाते.आजही शहर व ग्रामीण भागात ज्वारीची भाकरी हे मुख्य अन्न म्हणून वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. देशात महाराष्ट्र हा ज्वारी पिक घेण्यात आघाडीवर आहे. मॅग्नेशियम, काॅपर , ब गटातील जीवन सत्व असलेल्या ज्वारीचे पौष्टिक कडधान्य विषेश महत्त्व आहे.यावेळी तालुका कृषी कार्यालयातील सहाय्यक कृषी अधिकारी शितल पौळ यांनी फेब्रुवारी हा महिना ज्वारी पिकावर जनजागृती करण्यासाठी समर्पित केला असल्याचे सागितले. गंगाखेड प्रतिनिधी राजकुमार मुंडे.