शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बीड जिल्हा च्या वतीने शिवजन्मोत्सव 2023 विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा –शेख निजाम
बीड( प्रतिनिधी) बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती बीड शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बीड जिल्हा शिवसेना व सर्व संघटना व सर्व आजी-माजी पदाधिकारी यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालय जालना रोड बीड येथे माननीय जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले
शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या शिकवणीप्रमाणे माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे व आदित्यजी ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे शिवसेनेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने जास्तीत जास्त तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यानिमित्ताने करण्यात आला व शिवछत्रपतींची प्रेरणा घेऊन सध्या सुरू असलेल्या केंद्रीय जुलमी राजवटी विरोधात येथून उठण्याचा प्रण यावेळी सर्व उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी घेतला व येणाऱ्या काळात शिवसेनेचा भगवा प्रत्येक निवडणुकीत फडकावा असे साकडे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्त घालण्यात आले
बीड शहरात शिवजन्मोत्सवा निमित्त सर्व धर्मीय सार्वजनिक जयंती उत्सव रॅलीमध्ये सहभाग घेतला यावेळी सर्व धर्मीय शिवजन्मोत्सव सार्वजनिक रॅलीमध्ये विविध शाळेतील लहान लहान मुलांनी सादर केलेल्या देखाव्यांना भेट देण्यात आली व लहान लहान मुलांचे कौतुक करण्यात आले
शिवजन्मोत्सवानिमित्त जय हिंद कॅम्पस व शहर शिवसेना यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ येणाऱ्या सर्व शिवप्रेमी साठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती
या ठिकाणी अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्ती व शिवप्रेमींनी अल्पोपहाराचा लाभ घेतला व या केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले या अल्पपहाराच्या कार्यक्रमांमध्ये मुस्लिम समाजातील व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे निमित्त केलेली सेवा ही कौतुकाचा विषय ठरत होती
कर्मयोगी परिवार व शिवसेना यांच्या माध्यमातून मा सुदर्शन भैया धांडे यांच्या मार्गदर्शनात भव्य असे रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी अनेक तरुणांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून रक्तदान श्रेष्ठ दान ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने रक्तदान करून आपली शिवजयंती साजरी केली
बीड जिल्हा संघटक माननीय रतन तात्या गुजर यांच्या संकल्पनेतून लहान मुलांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली यावेळी लहान लहान मुलांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनातील विविध पैलू वर प्रकाश टाकला या वक्तृत्व स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या पारितोषिके वाटप करण्यात आली
शिवसेना नेते पप्पू बरीदे यांच्या नेतृत्वाखाली दत्त मंदिर परिसरात रॅली व शिव दर्शनासाठी आलेल्या शिवप्रेमींसाठी पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती
या वेळी शिवप्रेमींना थंडगार पाण्याच्या बिसलेरी बॉटल व व फळे वाटप करण्यात आली यासारखे असंख्य समाज उपयोगी उपक्रमांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिव जन्मोत्सव बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने साजरा करण्यात आला
या सर्व उपक्रमावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप, शिवसेना नेते शेख निजाम, ज्येष्ठ नेते श्याम भाऊ पडूले,बप्पासाहेब घुगे, मोईन मास्टर साहेब, महिला संघटक अॅण्ड. संगीता ताई चव्हाण, सुनील भाऊ अनभूले,गोरख शिंघण ,सुनील सुरवसे, पप्पू बरीदे, सुदर्शन धांडे, मशरू पठाण,हाफिज अशफाक,शेख खदिर, सर्व पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांची उपस्थिती होती