सोयगाव येथील कै. बाबुरावजी काळे मराठी शाळेत द दहावे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न
सोयगाव ,प्रतिनिधि/ यासीन बेग / पार पडले या स्नेहसंमेलनात इयत्ता .ज्यु.केजी ते नववी पर्यंत च्या विद्यार्थ्यांनी देवा श्री गणेशा, गाडी घुंगराची , शिवाजी महाराज यांचा पोवाडा, देशभक्ती गीत , नाटीका , बेटी बचाव , बेटी पढाव , अशा सुंदर सप्त कला गुणांचा अविष्काराने उपस्थितांची मने जिंकली होती. धनश्री निकम व सहकाऱ्यांनी नदीच्या पल्लाड आईचा डोंगूर या गाण्यावर उत्कृष्ट नृत्य सादर केल्याने प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने चिमुकल्यांना दाद दिली. दरम्यान स्नेह संमेलनाचे उद्घाटन सोयगाव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सपोनि अनमोल केदार यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.शिरीष पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष रवींद्र काळे, कृष्णा पाटील यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील अंजली कथलकर, शितल काटोले,योगेश काळे, मनिषा पाटिल, जयश्री श्रीवास्तव, शितल पवार आशा पंडित,प्रणय कुलकर्णी, विद्या पाटिल, नम्रता पाटिल, नलिनी पाटील, रोहिणी पाटील ,प्रेरणा मोरे या शिक्षक व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.
स्नेहसंमेलनाचे सुत्रसंचालन शितल पवार यांनी केले तर आभार प्रेरणा मोरे यांनी मानले. कार्यक्रमास पालक वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.