इकरा महाविद्यालयात ” शिक्षणा चे महत्व ” या विषयावर विद्यापीठा चे चर्चा सत्रा चे आयोजन..
जळगाव, प्रतिनिधी/ इकरा शिक्षण संस्था संचलित एच जे थीम महाविद्यालय मेहेरून जळगाव येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत विद्यार्थी विकास समिती द्वारा ” शिक्षणा चे महत्व” या विषयावर चर्चा सत्रा चे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमा चे उद्घाटन कला शाखांचे अधिष्ठाता डॉ प्रमोद पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे चे अध्यक्ष डॉ अब्दुल करीम सालार हे होते या वेळी डॉ.इकबाल शाह, डॉ.जबिअल्ला शाह, अब्दुल रशीद, सोहैल अमीर , प्राचार्य इब्राहिम पिंजारी, डॉ.वकार, प्रा. डॉ.चांद खान, डॉ.तनवीर खान,यांची उपस्थिती होती. प्रा.काजी मुजम्मिल यांनी सूत्र संचालन केले.
या वेळी महाविद्यालयतील विदयार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार डॉ.वाकार शेख यांनी मानले.