देवपिंप्री येथील 307 च्या गुन्ह्यातील आरोपीला अखेर अटकपुर्व जामीन मंजूर

0
109

देवपिंप्री येथील 307 च्या गुन्ह्यातील आरोपीला अखेर अटकपुर्व जामीन मंजूर

 

बीड (प्रतिनिधी):- मौजे देवपिंप्री ता.गेवराई येथे दि.20/12/2022 रोजी फिर्यादी अशोक भास्कर कुलकर्णी व त्याच्या आई व वडिलसह घरी असतांना सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सागर अशोक कुलकर्णी यांना त्याच गावातील आरोपी अक्षय नरवडे व भागवत नरवडे यांनी तुम्ही आम्हाला मतदान का केले नाही असे  फिर्यादीने म्हणताच आरोपींनी कत्ती व वीटाच्या सहाय्याने फिर्यादीला जबर मारहाण केल्या बाबत मजकूर फिर्यादीत नमूद करुन आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन गेवराई येथे दि.23/12/2022रोजी भादवि कलम 307, 324, 34, 504, 506 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर प्रकरणामध्ये आरोपी अक्षय नरवडे व त्याचे वडिल भागवत नरवडे (रा.देवपिंप्री, ता.गेवराई )यांचे विरुद्ध गुन्हा नोंद होवून तपासीक अंमलदार तपास करत होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये आरोपी यांनी त्यांना सदर गुन्ह्यात अटकपुर्व जामीन मिळावा या उद्देशाने तसेच न्याय मिळण्याच्या उद्देशाने विधिज्ञ अ‍ॅड.गणेश एम.कोल्हे जिल्हा व सत्र न्यायालय, बीड यांचे मार्फत बीड सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केला.

सदर प्रकरणामध्ये आरोपी पक्षाच्या वतीने अ‍ॅड.गणेश एम.कोल्हे यांनी आरोपीच्या बचावकामी युक्तीवाद न्यायालयात नोंद केला तसेच फिर्यादीच्या वतीने सरकारी पक्षाची युक्तीवाद नोंद करण्यात आला. तदनंतर सदर प्रकरण मध्ये आरोपी अक्षय नरवडे चा अटकपूर्व जामीन दि.7/02/2023 रोजी अटी व शर्तीच्या अधीन राहून मंजूर करण्यात आला व आरोपी भागवत दिगांबर नरवडेचा  दि.31/01/2023 रोजी अटकपूर्व अटी व शर्तीच्या अधीन राहून जामीन अ‍ॅड.गणेश एम.कोल्हे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन मंजूर करण्यात आला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here