बीड येथील अलहुदा उर्दू हायस्कूल येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप व पारितोषिक वितरण समारंभाचे यशस्वी आयोजन
प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विभाग जिल्हा परिषद बीड चे उपशिक्षणाधिकारी श्री तुकाराम पवार,
बीड 23 फेब्रुवारी (प्रतिनीधी) नूर एज्युकेशनल अॅण्ड वेलफेअर सोसायटी बीड द्वारा संचालित अलहुदा उर्दू हायस्कूल शहेनशाह नगर बीड मधुन या वर्षी एसएससी बोर्डाच्या परीक्षेत एकूण 45 विद्यार्थी सहभागी होत आहे . सदर विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नूर एज्युकेशनल अॅण्ड वेलफेअर सोसायटीचे सहसचिव माननीय जावेद अली खान यांनी भूषविली तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विभाग जिल्हा परिषद बीड चे उपशिक्षणाधिकारी श्री तुकाराम पवार, सोसायटीचे सदस्य शेख अब्दुल समद तांबोळी,लोक पत्रकार भागवत तावरे , खुदाई खिदमतगार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष पठाण आयुब खान , निवृत्त मुख्याध्यापक ख्वाजा नूर अल-सकलैन अन्सारी, निवृत्त शिक्षक गयासुद्दीन, रहनुमा अकादमीचे संचालक सय्यद मुजाहिद, एशियन फिजिओथेरपी हॉस्पिटलचे डॉ.शाहीन आमिर, श्रीमती मुनवर गयास बाजी आदी उपस्थित होते.
विद्यार्थी पठाण युसूफ याने पवित्र कुराण पठण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. उद्घाटनपर भाषण सादर करताना शाळेचे मुख्याध्यापक डॉ. सिराज खान आरजू यांनी शाळेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा सविस्तर अहवाल सादर केला, तसेच संस्थेचे सचिव उबेदुल्लाह खान यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पाठविलेले अभिनंदन संदेश वाचन केले. कार्यक्रमात इयत्ता नववीचे विद्यार्थी जुफीशान नाज व काझी ओवेस यांनी मनोगत व्यक्त केले, तर इयत्ता दहावीचे विद्यार्थी पठाण वजीहा बसीरत सिराज खान, शेख मुसैब फारुख, राईद अहसन खान, चौधरी मोहतशिम मोहसीन, पठाण अमरीन वाजिद, मोमीन दिबा सिरात यांनी मनोगत व्यक्त केले. , पठाण लुबना याकूब आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात नूर एज्युकेशनल अॅण्ड वेलफेअर सोसायटीचे सहसचिव जावेद अली खान, लोक पत्रकार भागवत तावरे, खुदाई खिदमतगार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष पठाण अय्युब खान, ख्वाजा नूर-उल सकलेन अन्सारी, गयासुद्दीन सर, सय्यद मुजाहिद, डॉ. शाहीन आमीर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक व परीक्षेच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले.
दहावी सराव परीक्षेत प्रथम पारितोषिक रायद अहसन खान, द्वितीय पारितोषिक पठाण आफिफाह गोहर अली खान आणि तृतीय पारितोषिक चौधरी मोहतशाम यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
असोसिएशन ऑफ मुस्लिम प्रोफेशनल यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत गुणवत्ता स्थान मिळवलेले विद्यार्थी चौधरी मोहतशम आणि विद्यार्थी वजीहा बसीरत यांना पारितोषिके देण्यात आले.
तसेच महाराष्ट्र शासनाच्यावतीने घेण्यात आलेल्या पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती मंजुर झालेली विद्यार्थिनी शेख मायरा कुलसूम मोईजुद्दीन, शिक्षक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या अध्यापन स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावणारी विद्यार्थिनी पठाण वजीहा बसीरत , द्वितीय पारितोषिक चौधरी मोहतशम आणि तृतीय क्रमांक पटकावलेली विद्यार्थिनी पठाण लूबना याकूब यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.
त्याच प्रमाणे सी पी एस ऑलिम्पियाड मध्ये सुवर्णपदक विजेता विद्यार्थीनी खान मुसिरा रफिक, आफिया अनाम सय्यद अकबरुद्दीन आणि कांस्यपदक विजेता विद्यार्थीनी शेख देरख्शान मुजफ्फर अली यांचा सर्व विशेष पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सूत्रसंचालनचे कर्तव्ये संयुक्तपणे नवव्या वर्गातील शेख मायरा कुलसूम, तांबोळी ताझीन,शेख अश्मीरा अदीब, खान कशफ असद आणि विद्यार्थी मुहम्मद अफफान यांनी पार पाडली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्कृतिक विभाग प्रमुख शेख अब्दुल हमीद, शिक्षक महंमद रफिक,शेख मोईजुद्दीन, सय्यद रहबर, शिक्षकेतर कर्मचारी शेख रफिक, शेख मसूद, युनूस खान आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.