आन्वा येथे मौलाना जाकेर सय्यद यांना मारहान गावात संचारबंदी;
पोलीस अधिक्षक, उपविभागीय अधिकारी यांची भेट : पारध पोलिससह राखीव पोलिस दल तैनात..
भोकरदन/ प्रतिनिधी /जुनेद पठाण -: भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील मौलाना हाफिज जाकेर खाव्जा सय्यद यांना अज्ञात व्यक्तींनी मारहाण केल्याची घटना घडली असून त्यांना औरंगाबाद शासकिय घाटी रुग्णायलात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पारध पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत मोरे यांनी तात्काळ भेट देऊन पहाणी केली असून सर्व समाज बांधवांना शातंता राखण्याचे आवाहन केले. परंतू घटना अतिशय निदयणी असल्याने जिल्हा पोलिस प्रशासनाने रविवारी रात्रीपासून तळ ठोकून आहे.
जालना पोलिस अधिक्षक डाॅ. अक्षय शिंदे, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, एलसीबी उपनिरीक्षक सुभाष भुजंग, उपविभागीय पोलिस अधिकारी ईदलसिंग बहूरे, भोकरदन पोलिस निरीक्षक आर. बी. जोगदंड, हसनाबाद सहायक पोलिस निरीक्षक घोडके यांनी घटनास्थळी भेट दिली.
या संदर्भात पारध पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आन्वा येथील मौलाना हाफिज जाकेर खाव्जा सय्यद हे रविवार रोजी सायंकाळी ७ : ३० वाजेच्या सुमारास जामा मस्जिद मध्ये तराहवीच्या नमाज करिता कुराण पाठण करीत असता काही अज्ञात व्यक्ती मस्जिद मध्ये आले आणि त्यांनी मौलाना हाफिज जाकेर सय्यद यांना लाथबुक्याने माराहण केल्याची तक्रार देण्यात आली असून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.