रोजा म्हणजे फक्त उपाशी राहणे नसुन रोजा शरिरातील प्रत्येक अवयांवर प्रतिबंध :- आमीर साहाब
पत्रकार जावेद शेख यांच्या ७ वर्षीय मुलगा-पुतण्यांनी पहिला रोजा पुर्ण..
पाटोदा / प्रतिनिधी/रोजा म्हणजे फक्त उपाशी राहने नसुन रोजा शरिरातील प्रत्येक अवयवांचा असुन प्रत्येक अवयवांवर प्रतिबंध असते. डोळ्यांनी वाईट पाहु नये, तोंडानी वाईट बोलु नये, तर कानांनी वाईट ऐकू नये, असे अनेक नियमावली म्हणजे रोजा असे प्रतिपादन पाटोद्याचे आमीर साहाब यांनी केले. ते पत्रकार जावेद शेख यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत बोलत होते.पत्रकार जावेद शेख यांचा ७ वर्षीय मुलगा शेख हुजेर पुतण्या शेख उमेर वाजेद(वय ७ वर्ष) तर पुतणी शेख तानीया खालेद (वय ८ वर्ष) यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा दि.२ एप्रिल रविवार रोजी पुर्ण केला. त्यानिमित्त त्याच्या निवासस्थानी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना रमजान सुरू असून या पवित्र महिन्यात मुस्लिम धर्मातील लहान-मोठे स्त्री-पुरुष महिनाभर उपवास (रोजा) ठेवून ईश्वराची प्रार्थना करतात. व पाच वेळा नमाज पठण करून पवित्र ग्रंथ कुराणाचे वाचन करून अल्लाहाकडे पूर्ण जगातील मानव जातीला सुख प्राप्त होवो सर्वांची मनोकामना पूर्ण होवो सर्वांना चांगले आरोग्य लाभो अशी (दुवा) प्रार्थना करण्यात येते. तसेच घरातील मोठ्याचे अनुकरण करत लहान चिमुकले रोजा ठेवतात. विशेष म्हणजे उन्हाचा पारा चढत असताना देखील हे चिमुकले रोजा ठेवत आहेत.हे खूप मोठी बाब असून अशा भर उन्हाच्या पाऱ्यात या मुलांनी आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केल्याने परिवारासह नातेवाईक,मित्रपरिवाराने त्यांचे कौतुक करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत..