विद्युत निरीक्षक कार्यालय बीड येथे पवित्र रमजान इफ्तार पार्टी चे आयोजन..
सर्व धर्म समभाव हिंदू ,मुस्लिम एकतेच्या नात्याने कार्यक्रमाचे आयोजन..
बीड/प्रतिनिधी/बीड शहरात आज विद्युत निरिक्षक कार्यालय बीड तर्फे विद्युत ठेकेदार,अभियंते,तंत्रज्ञ यांचे साठी पवित्र रमजान महिन्यात इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी श्री गणेश सोळंके,विद्युत निरीक्षक यांनी सर्वांचे स्वागत केले. इफ्तार पार्टीला रोटरी क्लब ऑफ बीड चे सचिव सुनील जोशी व रो.गणेश मुळे उपस्थित होते.या वेळी महावितरण चे तंत्रज्ञ,उपकेंद्र यंत्र चालक,अभियंते व विद्युत ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यालयातर्फे प्रथमच इफ्तार पार्टीचे आयोजन केले गेल्याचे बोलले जात होते.
कार्यक्रमामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य पाहण्यास मिळाले.