आमदार संदीप शिरसागर, यांच्या महाआघाडीने  15 जागा जिंकून बाजार समितीत . मा. आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या पॅनलची छत्री फाटली . …

0
121

आमदार संदीप शिरसागर, यांच्या महाआघाडीने  15 जागा जिंकून बाजार समितीत . मा. आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या पॅनलची छत्री फाटली . …

बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार संदीप शिरसागर 15 जागा जिंकून… झाले दणदणीत विजयी..

 

आमदार संदीप क्षीरसागर सय्यद सलीम, ज्योतीताई मेटे, अशोक दादा जगताप, राजेंद्र मस्के, सुशीला ताई, यांनी एकत्र येऊन बाजार समितीवर फडकला झेंडा

बीड-प्रतिनिधी/आज बीड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पुतण्या संदीप क्षीरसागर याने माजी मंत्री तथा आपले काका जयदत्त क्षीरसागर यांच्या 40 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला आहे क्षीरसागर यांच्या ताब्यात असलेली ही बाजार समिती आपल्याकडे खेचून घेण्यात संदीप यांना यश आले असून काकाला त्यांनी दिलेला धक्का राज्याच्या राजकारणात विशेष चर्चिला जात आहे,संदिप यांच्या पॅनल च्या पंधरा जागा निवडून आल्या आहेत तर काकांच्या पदरात 3 जागा पडल्या आहेत.हमाल मापाडी आणि व्यापारी वगळता इतर ठिकाणी आ क्षीरसागर यांनी वर्चस्व राखले.

शेतकरी व्यापारी आणि हमाल यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली बाजार समिती ताब्यात ठेवण्यासाठी प्रत्येकच पक्षाचे पुढारी आघाडीवर असतात बीडच्या बाजार समितीवर गेल्या 40 वर्षांपासून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे वर्चस्व आहे गेल्या 40 वर्षात शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी या बाजार समितीच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले आहे आजपर्यंत बहुतांश वेळा या बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोधच झालेली आहे मात्र यंदा पहिल्यांदाच त्यांचाच पुतण्या आमदार संदीप क्षीरसागर हे विरोधात सद्गुरू उभे असलेले निवडणूक चुरशीची झाली

बीड बाजार समितीच्या निवडणुकीत आ संदिप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या दोन पॅनल मध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली.आ क्षीरसागर यांनी भाजप,शिवसेना,उद्धव ठाकरे यांची शिवसेना,शिवसंग्राम यांची मोट बांधत जबरदस्त आव्हान दिले होते.माजीमंत्री क्षीरसागर यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांवर विश्वास दाखवला होता.

शुक्रवारी मतदानाच्या दिवशी संदिप क्षीरसागर यांनी आपले समर्थक मतदार ट्रॅव्हल बसमधून आणले होते.शनिवारी सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर आ क्षीरसागर यांच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घेत विजयाकडे वाटचाल केली.या विजयानंतर आ क्षीरसागर समर्थकांनी ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

Pathan E Hind Team


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here