जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा..
जुना बाजार येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहण सोहळा नेहमी प्रमाणे संपन्न झाला.
बीड/प्रतिनिधी/बीड शहरातील जुना बाजार येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत. सालाबाद प्रमाणे याही वर्षी ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या हर्ष उल्हासाच्या वातावरणा मध्ये संपन्न झाला.
७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बाल विवाह या विषया बद्दल जागृती व प्रतिबंधक प्रतिज्ञा घेण्यात आली, त्यानंतर कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे आणि मुख्याध्यापक यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व व स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वातंत्र्यसेनानी आपल्या प्राणाचे बलिदान व त्यांच्या उल्लेखनीय कार्याचे गुणगान व योगदान या विषयी मार्गदर्शक भाषणे दिली आणि सर्वात शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आभार प्रदर्शन करण्यात आले व देशभक्तीपर नारे लावून कार्यक्रमाची सांगता करण्यातआली.
अश्या प्रकारे स्वातंत्र्य दिन सोहळा अगदी धूमधामात पार पाडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून फहीम इनामदार, रियाज सिद्दीकी, सलिम शेख तसेच शिक्षक कर्मचारी व विद्यर्थी उपस्थित होते.