15 ऑगस्ट, 2023 रोजी “झाडे लावा झाडे जगवा’’. वृक्ष लागवड दिन कार्यक्रमचे संपन्न झाले. .
जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड श्री. आनंद एल. यावलकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ..
बीड/ प्रतिनिधी/ वृक्ष लागवड दिन साजरा करण्यात आले
आज दिनांक 15 ऑगस्ट, 2023 रोजी मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड श्री. आनंद एल. यावलकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपन कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड व वन विभाग, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘‘झाडे लावा झाडे जगवा’’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमात अध्यक्ष यांनी वृक्ष लागवडीबाबतचे व पर्यावरण जपवणुकीचे मोलाचे मार्गदर्शन केले.
सदरील कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती श्री. अमोल बा. गर्कळ, विभागीय वन अधिकारी(प्रा.), बीड यांची होती. त्यांनी वृक्षाबाबत माहिती, संगोपन कसे करता येईल व आपल्या दैनदिंन आयुष्यात वृक्ष हे किती उपयोगी व गरजेचे आहे या बाबतची माहिती सांगितली. तसेच या कार्यक्रमास जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायिक अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. सदर वृक्षारोपन कार्यक्रमाचे नियोजन श्री अशोक काकडे वनपरिक्षेत्र अधिकारी बीड ,श्री गाडेकर वनपाल बीड ,श्री बहिरवाल वनपाल नेकनूर ,श्री टाकणखार वनपाल गेवराई तसेच वनरक्षक ,वनकर्मचारी सर्व यांनी नियोजन केले तसेच या कार्यात न्यायिक अधिकारी यांनी आपले विशेष सहयोग व सहभाग दर्शविला आहे.
सदरील कार्यक्रम सह्मादी देवराई बीड या ठिकाणी घेण्यात आला व जिल्हा न्यायालयातील न्यायिक अधिकारी व कर्मचारी तसेच वनाधिकारी ,वनकर्मचारी यांची एकुण उपस्थिती 70 होती.