हजरत शहिंशाहवली रा.च्या ऊर्स निमित्त बीड जिल्ह्यामध्ये भव्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन.!
29-30 व 1 ऑक्टोबर या तीन दिवस होणार हे स्पर्धा.
बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रिडा संकुला( मल्टीपर्पज ग्राउंड)वर होणार स्पर्धा जिल्हयातील फुटबॉल संघानी स्पर्धेत नाव नोंदवण्याचे “पठाण अयुब खान” आयोजकांतर्फे आवाहन.
बीड /प्रतिनिधी/ बीड जिल्हयात प्रसिध्द असलेल्या दर्गा हजरत कोचकशाह उर्फ शहिंशाह वली रा यांच्या ऊर्स निमित्त बीड मध्ये भव्य जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन
बीडच्या छत्रपती संभाजी महाराज(मल्टीपर्पज ग्राउंड) शिवाजी चौक या क्रिडांगणावर होणार आहे. दि.29-30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर अशा तीन दिवस हे स्पर्धा होणार आहे या साठी जिल्हयातील सर्व फुटबॉल संघानी या स्पर्धेत नांव नांदवावे असे आवाहन फुटबॉल कृति समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की जिल्हयात प्रसिध्द असलेल्या दर्गा हजरत कोचकशाह वली उर्फ शहिंशाहवली यांच्या संदल निमित्त बीडमध्ये जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या करीता काल बशीरगंज येथील जमियत च्या जिल्हा कार्यालयात येथे.आयोजक पठाण अयुब खान यांनी शहीनशावली ऊस कमिटी ची एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाज सेवक सय्यद मोईन मास्टर हे होते. प्रमुख उपस्थिती मध्ये न.प.चे माजी उपनगराध्यक्ष सय्यद फारूक पटेल, शेख शाकेर, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अॅड.शेख शफिक , नगरसेवक अशफाक इनामदार, जलिल खान पठाण, जैयतुल्लाह खान, मुकीद लाला यांची उपस्थिती होती. या बैठकीत फुटबॉल विषयी चर्चा करण्यात आली या पुर्वी ही अशाच पध्दतीने राज्यस्तरीय व ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येत होते काही कारणास्ताव मागील काही वर्षापासून हे स्पर्धा घेण्यात येत नव्हती आता पुन्हा नव्या जोमाने या वर्षी जिल्हास्तरीय आणि पुढील वर्षापासून ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धा घेण्याचे ठरले आहे व तसेच ऊर्स संदल निमित्त दर्गा परिसरात स्वच्छता मोहिम ही राबविण्याचे ठरले आहे. या स्पर्धे मध्ये प्रथम व द्वितीय पारीतोषिक देण्यात येणार आहे.
पहिला पारितोषीक 25 हजार रूपये, ट्रॉफी व द्विंतीय पारितोषीक 15 हजार रूपये व ट्रॉफी राहणार आहे. त्याच सोबत बेस्ट गोलकिपर मॅनऑफ दि मॅच सह इतर दहा पारीतोषीक राहणार आहे.
या स्पर्धेत या संघाला भाग घ्यायचा आहे त्यांनी आपले नांव नोंदवावे नाव नोंदण्याचे ठिकाण पठाण अय्युब खान यांचे संपर्क कार्यालय बशीरगंज येथे आहे मोबाईल क्रमांक 9422244650 या वर इतर माहिती घेवू शकतात. या झालेल्या बैठकीत इसाहाक सर, पठाण मुकरम जान, काजी मुजीबुरहेमान, जफर चिशती , शकिल खान, समीर सरकार, बरकत खान पठाण, संपादक खमरूल इमान, इम्रान जागीरदार, जावेद पाशा सर, शेख मुउजमील,कैसर चिशती, शेख इम्रान,शेख,माजेद ,शेखअफर्रोज सर,शेख अय्युब,अफसर खान ,मकसुद खान,लाला,शेख शहबाज यांच्या सह अनेक फुटबॉल प्रेमी व इतर मान्यवर उपस्थित होते.