आदित्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सार्वजनिक वस्तू वितरण विषयी शिनु गंगरडे यांचे मार्गदर्शन
बीड/ प्रतिनिधी/बीड शहरातील आदित्य शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबर सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात. प्रत्यक्ष प्रात्यक्षीकांवर नेहमीच भर दिला जातो. काल आदित्य शिक्षण संस्थेचे संचालक मा.डॉ. आदित्य भैय्या सारडा,वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी च्या कार्यकारी सदस्य तथा आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ.आदिती सारडा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने सार्वजनिक वस्तू वितरण विषयी शिनु गंगरडे यांचे मार्गदर्शन ठेवण्यात आले होते.
यावेळी त्यांनी भारतीय मानक ब्यूरो ( बीआयएस) म्हणजे काय? या संस्थेची उद्दिष्टे काय आहेत? तसेच उत्पादनावर आय.एस.आय. (आयएसआय) मार्किंग, रजिस्ट्रेशन मार्किंग व हॉल मार्क कशी केली जाते. व अनुक्रमे कोणत्या उत्पादनावर केली जाते याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. भारत सरकार द्वारे ग्राहक जागरूकता निर्माण करण्यासाठी कोणते कोणते विविध उपक्रम घेतले जातात हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यावेळी प्राचार्य. श्री.राहुल खडके, प्राचार्य डॉ. पंकज कडू, प्राचार्य. डॉ. संतोष जैन, प्राचार्य दीपक भुसारी, प्राचार्य प्रल्हाद वाघ यांच्यासह सर्व विभाग प्रमुख , प्राध्यापक आणि आदित्य शिक्षण संस्थेतील विद्यार्थी मोठ्या संखयेने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.आदमाने सर, प्रा. थिगळे सर, प्रा. ज्ञानेश्वर वाघमोडे सर,प्रा. मुळे सर, प्रा. शिंदे सर, प्रा. सवासे मॅडम ,प्रा चव्हाण सर, प्रा सातपुते सर यांनी परिश्रम घेतले. आदित्य शिक्षण संस्थेतील 37 विद्यार्थ्यांची स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात आली. हे स्वयंसेवक ग्राहकांपर्यंत पोहोचून त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणार आहेत.