चकलांबा सरपंचपदी सौ प्रियंका शिवप्रसाद खेडकर विजयी
श्री रोकडेश्वर पॅनलचे सर्व 13 उमेदवार बहुमतांनी विजयी
बीड दि.6 (प्रतिनिधी):
गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील ग्रामपंचायत निवडणूकीत श्री रोकडेश्वर पॅनलला ऐतिहासिक विजय झाला आहे. पॅनलच्या सरपंच पदासाठीच्या उमेदवार सौ प्रियंका शिवप्रसाद खेडकर यांनी एकूण 2709 मिळाली. सौ प्रियंका खेडकर यांचा 1950 मतांनी एकतर्फी विजय झाला. या पॅनलचे 13 पैकी 13 उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झाले. गेवराई तालुक्यातील चकलांबा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवार दि. 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान झाले. दि. 6 ऑक्टोबर रोजी मतमोजणी झाली यामध्ये श्री रोकडेश्वर पॅनलच्या सौ.प्रियंका शिवप्रसाद खेडकर यांनी अपेक्षेप्रमाणे मोठा विजय प्राप्त केला. सुरुवाती पासूनच सदर ग्रामपंचायतची निवडणूक ही एकतर्फी होणार हे दिसून येत होते. निवडणुकीत या पॅनलचे सर्वच्या सर्व 13 उमेदवार आणि सरपंच पदाच्या उमेदवार मोठया फरकाने विजयी झाले. सौ. प्रियंका खेडकर यांना एकूण 2709 मते मिळाली त्या 1929 मते घेऊन मोठ्या फरकाने विजयी झाल्या आहेत.
सदस्यपदी निवडून आलेले उमेदवार आणि मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत. वार्ड क्रमांक 1 मधून छाजेड आणि अमोलचंद (511), सौ साळवे लक्ष्मी सोमनाथ आणि सौ. गुंजाळ जया कुंडलिक (578), वार्ड क्रमांक 2 मधून गाडे गणेश दादाराव (562) आणि खेडकर पुष्पा बाळू (435), वार्ड क्रमांक 3 मधून खेडकर आदिनाथ अर्जुन (545), नागरे ज्ञानेश्वर शहादेव (598) आणि सौ. खेडकर गयाबाई बाळासाहेब (710), वार्ड क्रमांक 4 मधून पठाण इस्माईल रमजान (352), सौ. साळवे आशाबाई नवनाथ (362), वार्ड क्रमांक 5 मधून शेख इस्माईल रमजान (352) आणि पिंगळे संगीता पोपट (306).
सरपंच पदाच्या विजयानंतर चकलांबा गावात सरपंच सौ. प्रियंका शिवप्रसाद प्रसाद खेडकर आणि विजयी उमेदवाराची भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावातील कार्यकर्ते, नागरिक आणि युवक यांच्यासह महिलांची प्रचंड मोठी उपस्थिती होती. मिरवणुकीनंतर श्री रोकडेश्वराच्या मंदिरात श्रीफळ वाढवून व आरती करून करण्यात आला.
यावेळी कार्यकारी अभियंता शिवप्रसाद खेडकर यांनी मतदार आणि सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानून विकासासाठी वचनबद्ध असल्याचे म्हटले. यावेळी सुभाष छाजेड, नारायण नागरे, उद्धव खेडकर आदींनी मनोगत व्यक्त करून विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.