शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड :- नुमान चाऊस

0
105

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड :- नुमान चाऊस

कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी चाऊस यांना दिलेला शब्द पाळला

माजलगाव. / प्रतिनिधी, दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब हे माजलगावला आले असता त्यांना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दीपावलीपूर्वी 25% पीक विमा तात्काळ द्यावा अशी मागणी मौलाना आझाद युवा मंचच्या वतीने जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी केली होती ज्याला पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिले होते व पिक विमा लवकरच वाटप होईल असे आश्वासन दिले होते याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यातील 7 लाख 70 हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम पीकविमा रक्कम मिळणार आहे. भारतीय पीकविमा कंपनीकडून यासाठी एकूण ₹241 कोटी रक्कम बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिवाळी आधी जमा होणार आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here