साईनगर(इटोली) तांडा येथे गोर बंजारा समाजाच्या वतीने ऐतिहासिक गोर मळावाचे आयोज
नायक कारभारी व नोकरदारांचा पिहल्याच वेळेस होणार सत्कार..
जिंतूर / प्रतिनिधी /माबुद खान
जिंतूर : तालुक्यातील साईनगर तांडा ( इटोली ) येथे गोर सीकवाडी गोर सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने गोर मेळाव्याचे आयोजन दि.१४ नोव्हेंबर मंगळवार रोजी होणार आहे. गोर सीकवाडीचे मुख्य संयोजक तथा गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांची या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून जिंतूर नगरी मधील सोहमगड-अमरगड येथील ह.भ.प माऊली महाराज व प्रा. यशवंत पवार (गोर गावंळ्या दळ अध्यक्ष महाराष्ट्र) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. गोर सीकवडीचे संयोजक तथा गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा, उडीसा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश त्याचबरोबर राजस्थान या राज्यात माघील २३ वर्षापासून गोर सेना दिशा देण्याचे कार्य करत आहे. या मळावामध्ये गोर बंजारा समाजाची वहिवाट व इतिहास प्रदर्शित करण्यात येणार आहे. या मळावामध्ये जिंतूर तालुक्यातील सर्व तांड्याचा समावेश असणार आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित राहुन या ऐतिहासिक मळावाचे साक्षीदार बनावे असे आग्रहाचे आवाहन गोर सीकवाडी व गोर सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.