“समाजसेवा हीच ईश्वर सेवा” निस्वार्थी पणे समाजकार्याला प्राधान्य देनारे. स्व. छगनबापू पाटील यांची ओळख.
सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून समाजकार्याला प्राधान्य देत राजकारणात काम व त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय …
इस्लामपूर /प्रतिनिधी/
इकबाल पीरजादे/
सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून समाजकार्याला प्राधान्य देत राजकारणात मोठ्या झालेल्या निस्वार्थी व्यक्ती म्हणून स्व. छगनबापू पाटील यांचा नामोल्लेख प्राधान्याने करावा लागेल असे प्रतिपादन कादंबरीकार दि.बा पाटील यांनी केले
ते कामेरी तालुका वाळवा येथे जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष स्व. छगनबापू पाटील यांच्या 28 व्या पुण्यतिथी निमित्त जय भवानी सोसायटी कामेरी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी दि.बा पाटील यांनी आपल्या राजकीय पदाचा वापर आयुष्यभर
सर्वसामान्य लोकांच्यासाठी करणाऱ्या स्व. छगनबापू पाटील यांचा आदर्श डोळयासमोर ठेवत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयराज पाटील यांनी काम करावे असे आवहान त्यानी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ.शकुंतला पाटील व संपतराव पाटील यांचे हस्ते स्व छगनबापू पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमास भाजपा सांगली जिल्हा उपाध्यक्ष जयराज पाटील,उपसरपंच नंदू काका पाटील माजी अध्यक्ष दिलीप जाधव,शशिकांत पाटील,व्हाईट चेअरम नितीन बारपटे,सचिव समद मुल्ला
छगनबापू पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष जयदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य सदस्या सौ. सुजाता पाटील , सुभाष
बारपटे,ज्ञानदेव जेडगे, अशोक जाधव, शेतकरी दूध संस्थेचे अध्यक्ष गुंडा माळी, राहुल पाटील, यासिन मगदूम, आनंदराव शेलार , शशिकांत पाटील,उपस्थित होते जयदीप पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर श्री.जय भवानी सोसायटीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी आभार मानले.कामेरी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच रणजित पाटील यांनी स्व छगनबापू पाटील यांच्या प्रतिमेस तर यशवंत गलुकोजचे संचालक शहाजी पाटील यांनी स्व.वसंत दादा पाटील, तसेच शेतकरी दूध शेतकरी दूध संस्थेत जयराज पाटील यांचे हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी अधक्ष गुंडा माळी
सचिव निवृत्ती पाटील, प्रदीप पाटील, जगदीश जाधव उपस्थित होते